spot_img
spot_img
spot_img

भोसरीत ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची १.५० लाखांची फसवणूक; पिकअप वाहनासह माल लंपास

शबनम न्यूज | प्रतिनिधी

बोलरो पिकअप वाहनाद्वारे नेण्यात येणाऱ्या मालाचा अपहार केल्याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी आरोपी चालक सध्या फरार असून पोलिसांकडून शोध सुरू आहे.

दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी ५ ते ८ वाजण्याच्या सुमारास दर्शन लॉजवेज ट्रान्सपोर्ट, बोन्हाडेवाडी, मोशी, पुणे येथून फिर्यादी सोनल बाळभिम अरडे (वय ३२, व्यवसाय – ट्रान्सपोर्ट) यांनी त्यांच्या बोलेरो पिकअप वाहन (क्रमांक MH १४ JL ८३४८) मधून सुमारे १ लाख ५० हजार रुपयांचे किमतीचे लोखंडी पार्ट्स नशे येथील एफटेक इंजिनिअर्स कंपनीकडे पाठवले होते.

सदर वाहनाचा चालक इरफान अन्सारी (वय २६, मूळ राहणार नेवासूर हुजरा, महाराजगंज, उत्तर प्रदेश) याने माल नियोजित ठिकाणी न पोहोचवता फिर्यादींचा विश्वासघात केला. त्यानंतर मालाची कुठेतरी विक्री करून वाहन नवी मुंबई विमानतळाजवळ सोडून आरोपी फरार झाल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३१६(४) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी अद्याप अटक करण्यात आलेली नाही. पुढील तपास भोसरी एमआयडीसी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!