spot_img
spot_img
spot_img

महाळुंगे येथे जुगार अड्ड्यावर छापा; पाच जणांविरोधात गुन्हा, रोख रक्कम व साहित्य जप्त

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाळुंगे परिसरात सुरू असलेल्या बेकायदेशीर जुगार अड्ड्यावर दक्षिण महालुंगे एमआयडीसी पोलिसांनी धाडसी कारवाई करत पाच जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

या कारवाईत रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य तसेच मोबाईल फोन असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

ही कारवाई दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.५० वाजता खालुंबे गावच्या हद्दीत, एमपी चौकाजवळील कोर्टयार्ड हॉटेलच्या मागील बाजूस असलेल्या झाडांच्या आडोशाला, तळेगाव रिक्षा स्टँडच्या पाठीमागील परिसरात करण्यात आली.

याप्रकरणी रात्री ८ वाजता दक्षिण महाळुंगे एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणी पोलीस नाईक बाळासाहेब एकनाथ बोरकर यांनी फिर्याद दिली आहे. आरोपींमध्ये
अजित बाकुल्ला सुलतानी (वय ३०), सागर बंटी माळवे (वय २०), शिवदास रतन पवार, बाबा व शाहिद (पूर्ण नाव व पत्ता अद्याप अस्पष्ट) यांचा समावेश आहे. यापैकी आरोपी क्रमांक १ व २ यांना यापूर्वीही जुगारप्रकरणी नोटीस बजावण्यात आलेली असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी लोकांकडून पैसे लावून ‘काळा-पिवळा पाच स्टार काईड’ या प्रकारचा जुगार खेळवित होते. छाप्यात ३,२५० रुपये रोख रक्कम, जुगार खेळण्याचे साहित्य व डमी मोबाईल हँडसेट असा एकूण ५,२५० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

कारवाईदरम्यान काही आरोपी पळून जाण्यात यशस्वी झाले.
या प्रकरणी आरोपींविरोधात महाराष्ट्र जुगार प्रतिबंध अधिनियम १८८७ अंतर्गत कलम १२(अ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास दक्षिण महालुंगे एमआयडीसी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!