spot_img
spot_img
spot_img

बाहा – एसएइ इंडिया स्पर्धेत पीसीसीओईचा द्वितीय क्रमांक

शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या सर्व अभियांत्रिकी महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष कार्यानुभव आणि औद्योगिक आस्थापना मधील अनुभव मिळावा. तसेच सद्य परिस्थितीत औद्योगिक क्षेत्राची उच्चशिक्षित, तंत्र कुशल मनुष्यबळाची मागणी विचारात घेऊन नियोजन केले जाते. या अंतर्गत अभियांत्रिकीच्या विद्यार्थ्यांसाठी देशपातळीवर आयोजित केल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये पीसीसीओइचे विद्यार्थी सहभागी होऊन बक्षीस मिळवतात आणि आपल्या संस्थेचे व महाविद्यालयाचे नाव उंचावतात. हा क्षण प्राध्यापकांबरोबरच पीसीइटीच्या विश्वस्त मंडळाला देखील कौतुकास्पद आहे असे गौरवोउद्गार पीसीटीइटीचे सचिव विठ्ठल काळभोर यांनी काढले.
      पिथमपुर, मध्य प्रदेश येथील नॅशनल ऑटोमोटिव्ह टेस्ट ट्रॅक्स येथे बाहा एसएई इंडिया – २०२६ या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग (पीसीसीओई) मधील टीम रेड बॅरन च्या विद्यार्थ्यांनी द्वितीय क्रमांकाचे ७५ हजार रुपयांचे पारितोषिक पटकावले. या विद्यार्थ्यांचा सत्कार विठ्ठल काळभोर यांच्या हस्ते करण्यात आला.
   यावेळी पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओई चे संचालक डॉ. जी. एन. कुलकर्णी, अधिष्ठाता – विद्यार्थी विकास व कल्याण डॉ. पी. ए. देशमुख, सहयोगी अधिष्ठाता अमित पंचवडकर, मार्गदर्शक प्रा. उम्मीद शेख यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 
   या राष्ट्रीय स्पर्धेत देशभरातून १०० पेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांच्या संघांनी सहभाग घेतला होता. ‘टीम रेड बॅरन’ने स्टॅटिक आणि डायनॅमिक दोन्ही प्रकारच्या स्पर्धांमध्ये उत्कृष्ट कामगिरी केली. मॅन्युफॅक्चरिंग एक्सलन्स, सेल्स, एन्ड्युरन्स, मॅन्युव्हरेबिनिटी, ओव्हरऑल डायनॅमिक्स आणि स्टॅटिक्स या प्रकारांमध्ये पहिल्या पाच संघांत पीसीसीओईने स्थान मिळवले. ‘टीम रेड बॅरन’ मध्ये देवांश रहाटे, इशान भोसले, अंश्रित सुंबळी, प्रणव गोखले, अथर्व चोरगे, तुषार माडीवाला, राज कांगणे, श्रुती दवंगे, पार्थ शिंदे  व इतर विद्यार्थ्यांचा समावेश होता.
   टीमने सादर केलेले इलेक्ट्रिक ऑल-टेरेन व्हेईकल (ई-एटीव्ही) हे स्पर्धेतील एकमेव वाहन होते. ज्यामध्ये खरी फोर – व्हील ड्राइव्ह यंत्रणा वापरण्यात आली होती. या वाहनामध्ये विद्यार्थ्यांनी स्वतः विकसित केलेली २-व्हील ड्राइव्ह, ४-व्हील ड्राइव्ह, डायनॅमिक शिफ्टिंग यंत्रणा समाविष्ट केली होती. त्यासाठी पेटंट अर्ज दाखल करण्यात आला आहे. याशिवाय पूर्णतः विद्यालयामध्येच विकसित व परीक्षण केलेला बॅटरी पॅक आणि संबंधित इलेक्ट्रॉनिक सिस्टिम्स देखील वाहनात वापरले गेले होते.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!