spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रव्यापी औद्योगिक पुणे परिषदेमध्ये संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन चळवळीला मिळाली नवी गती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडियाच्या वतीने दोन दिवसीय संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन
विषयी चौथे राष्ट्रीय स्तरावरील परिषद, भोसरी येथील क्वालिटी सर्कल एसलन्स सेंटर मध्ये संपन्न झाली.
या दोन दिवसीय परिषदेमध्ये आठ राज्यातील ३३ उद्योग समूहांमधून ३७८ प्रतिनिधींनी सहभाग नोंदविला.
या परिषदेमध्ये ९७ गुणवत्ता केस स्टडी आणि २० विविध विषयावरील तज्ञांची सत्रे सादर करण्यात आली.
ज्यामुळे देशभरातील विविध उद्योग समूहातील प्रतिनिधींमध्ये संपूर्ण गुणवत्ता चळवळीबद्दल वाढती
बांधिलकी अधोरेखीत झाली.
या परिषदेचे आयोजन सेंटर ऑफ एसलन्सच्या वतीने करण्यात आले होते व आयोजनाचे यजमानपद
कॉलिटी सर्कल फोरम ऑफ इंडिया पुणे चाप्टरने भूषविले होते. यात देशभरातील विविध उद्योग क्षेत्रातील तज्ञ,
उच्च पदाधिकारी, विभाग प्रमुख, वरिष्ठ अधिकारी, शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांनी सक्रिय सहभाग नोंदविला.
ज्यामुळे ज्ञान विनिमयासाठी हे व्यासपीठ अत्यंत समृद्ध ठरले.
या परिषदेचे उद्घाटन हुंदाई मोटर्स पुणे येथील प्लांट हेड श्याम सिंह यांच्या हस्ते करण्यात आले त्यांनी व्यापक
औद्योगिक अनुभवातील सर्वोत्तम पद्धतीचे मार्गदर्शन त्यानी केले. तर समारोप समारंभ आर. आर. ग्लोबल ग्रुपचे मुख्य
प्रशासकीय अधिकारी संजीव निमकर यांच्या हस्ते झाले. त्यांनी उद्योग क्षेत्रातील संपूर्ण गुणवत्ता व्यवस्थापन विषयी
जागतिक स्तरावरील दृष्टिकोन आपल्या मनोगतात मांडला. यावेळी व्यासपीठावरती कॉलिटी सर्कल फोरम ऑफ
इंडियाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष सतीश काळोखे, राष्ट्रीय अध्यक्ष अविनाश मिश्रा , कार्यकारी संचालक डी. के. श्रीवास्तव,
सेंटर ऑफ एसलन्स विभागाचे सीईओ सुनील श्रीवास्तव समवेत पुणे चॅप्टरचे पदाधिकारी, कौन्सिल सदस्य
उपस्थित होते.
या परिषदेमध्ये टाटा मोटर्स, के. के. नाग, थरमॅक्स , सिमेन्स, लूमॅक्स , मदरसन सुमी, भारत इलेट्रॉनिक्स ,
डेलवॉल आणि कमीन्स या अग्रगण्य उद्योग समूहातील तज्ञ वक्त्यानी परिवर्तनकारी पद्धतीची माहिती उपस्थितांना
सविस्तरपणे विविध दाखले देत विशद केली. या परिषदेमध्ये जागतिक उद्योग क्षेत्रातील अस्थिरता, अनिश्चितता,
गुंतागुंत आणि अस्पष्टता बाबत तयारी. उद्योग समूहात कृत्रिम बुद्धिमत्ता ची भविष्यातील भूमिका. राष्ट्रीय प्रगतीसाठी
विविध भारतीय उद्योग समूहातील कामगारांच्या नेतृत्व गुणांचा विकास. दुसर्‍याच्या अनुभवातून शिकण्याची संधी.
त्याच्या सांघिक भावनेत वाढ होते. त्यामुळे उद्योग समूहाला उत्पादकतेत वाढ होते .उत्पादनाची गुणवत्ता व दर्जा
यामध्ये प्रगती व सुधारणा होऊन जागतिक बाजारपेठेत स्वतःचे स्थान कसे पक्के करता येते. जेणेकरून देशभर संपूर्ण
गुणवत्ता व्यवस्थापन चळवळ अधिक वेगाने व जोमाने प्रसार करून आपल्या देशाच्या प्रगतीच्या प्रवासात धोरणात्मक
भागीदार म्हणून उभ्या राहण्याचा उद्योगसमूहांनी या परिषदेमध्ये निर्धार व्यक्त केला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!