spot_img
spot_img
spot_img

अखिल भारतीय पशु-पक्षी प्रदर्शन महा पशुधन एक्स्पो, २०२६ : अधिकृत लोगोचे निवासी जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते अनावरण

शबनम न्यूज | प्रतिनिधी

महाराष्ट्र शासनाच्या पशुसवर्धन विभागाच्या वतीने आगामी १३ ते १५ फेब्रुवारी २०२६ या कालावधीत परळी वैजनाथ (जि. बीड) येथे आयोजित करण्यात आलेल्या ऐतिहासिक ‘अखिल भारतीय पशु पक्षी महा पशुधन एक्स्पो, २०२६ प्रदर्शनाच्या अधिकृत लोगोचे निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती कदम यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयात अनावरण करण्यात आले.

यावेळी जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त डॉ राजेशकुमार वासनिक, डॉ. विष्णू गर्जे, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन, डॉ प्रवीण पवार सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व विभागाचे इतर अधीकारी उपस्थित होते.

श्रीमती कदम म्हणाल्या, पशुपालन हा ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. परळी वैजनाथ येथे होणारे हे प्रदर्शन देशातील जातीवंत पशुधन आणि आधुनिक तंत्रज्ञान यांचा संगम असणार आहे. या प्रदर्शनाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दुग्ध व्यवसायातील जागतिक दर्जाचे तंत्रज्ञान घरबसल्या पाहायला मिळणार आहे. जिल्ह्यातील अधिकाधिक पशुपालक, तरुण उद्योजक आणि शेतकरी बाधवानी मोठ्या सख्येने या प्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन श्रीमती कदम यांनी केले.

राज्यातील व राज्याबाहेरील जातीवत गायी, म्हशी, शेळ्या-मेंढ्या आणि पक्ष्याच्या विविध प्रजातींचे दर्शन घडणार आहे. आधुनिक डेअरी फार्मिंग, चारा नियोजन आणि प्रक्रिया उद्योगांचे भव्य स्टॉल्स असणार आहेत. पशुधनाचे आरोग्य, लसीकरण आणि वैज्ञानिक संगोपन यावर तज्ज्ञ पशुवैद्यकांची विशेष व्याख्याने आयोजित केली आहेत, अशी माहिती डॉ. राजेशकुमार वासनिक यांनी दिली.

जिल्ह्यातील सर्व पशुवैद्यकीय संस्था, पंचायत समिती आणि सार्वजनिक ठिकाणी बॅनर व पोस्टर्सच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येणार आहे. विविध समाज माध्यमाच्याद्वारे माध्यमातूनही माहिती उपलब्ध करुन देण्यात येणार आहव. तरी, जिल्ह्यातील सर्व पशुपालक बांधवानी या महोत्सवात सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!