spot_img
spot_img
spot_img

निगडीतील सार्वजनिक शौचालयाजवळ धारदार शस्त्राने हल्ला; तिघांविरोधात गुन्हा दाखल

शबनम न्यूज | प्रतिनिधी

निगडी परिसरात सार्वजनिक ठिकाणी एका तरुणावर धारदार शस्त्राने हल्ला करून गंभीर जखमी केल्याची घटना घडली असून, या प्रकरणी निगडी पोलीस ठाण्यात तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सध्या आरोपी फरार असून पोलिसांकडून त्यांचा शोध सुरू आहे.

ही घटना दि. ०९ फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७ वाजता कुसुम प्लायवुड दुकानासमोरील पायवाटेवर, सार्वजनिक शौचालयाजवळ, पत्राशेड अंजनानगर, निगडी येथे घडली. याबाबत दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ९.३८ वाजता गुन्हा नोंदविण्यात आला.

या प्रकरणी पृथ्वीराज गोविंद मुंडे (वय १९, व्यवसाय – बजाज शोरूम येथे नोकरी, रा. चिंचवड, पुणे; मूळ रा. लातूर जिल्हा) यांनी फिर्याद दिली आहे. आरोपी प्रसाद नामक तरुण (वय अंदाजे २५) व त्याचे दोन अनोळखी साथीदार (वय अंदाजे २० ते २५) यांच्याविरोधात भारतीय न्याय संहिता, भारतीय हत्यार कायदा तसेच महाराष्ट्र पोलीस कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी आपल्या मित्रासोबत सार्वजनिक शौचालयाजवळ बसले असताना आरोपींनी अचानक संगनमत करून फिर्यादीवर हल्ला केला.

आरोपी प्रसाद याने हातातील धारदार कोयत्याने फिर्यादीच्या उजव्या हातावर वार करून गंभीर दुखापत केली, तर इतर दोघांनी शिवीगाळ व धमकी दिली.

या घटनेनंतर आरोपी घटनास्थळावरून फरार झाले. जखमी फिर्यादीवर उपचार सुरू असून, पुढील तपास निगडी पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!