शबनम न्यूज | प्रतिनिधी
तळेगाव दाभाडे परिसरात सार्वजनिक ठिकाणी अश्लील हावभाव करून नागरिकांमध्ये अस्वस्थता निर्माण केल्याप्रकरणी दोन महिलांविरोधात अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई पिंपरी-चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या गुन्हे शाखेने केली आहे.
ही घटना दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ७.०५ वाजता सोमाटणे फाटा ते तळेगाव रोडच्या डाव्या बाजूस असलेल्या गोपाळ सायकल टायर नावाच्या दुकानाच्या शेजारी, सिमेंटच्या रोडवर घडली. याबाबत दि. १० फेब्रुवारी २०२६ रोजी रात्री ११.२३ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला.
या प्रकरणी लता बाबू दोडकर (वय ४३, रा. इंदिरानगर, लोणगाव रोड, पुणे) आणि लता सिद्धेश्वर सूर्यवंशी (वय ४९, सध्या रा. वडगाव मावळ, मूळ रा. बांगलवाडी, दोन्जा, उस्मानाबाद) यांच्याविरोधात कारवाई करण्यात आली आहे. मात्र, सदर आरोपी महिला सध्या अटकेत नसल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नमूद महिलांनी वेश्याव्यवसाय करण्याच्या उद्देशाने सार्वजनिक ठिकाणी लैंगिक हावभाव करून, शब्द उच्चारत ये-जा करणाऱ्या नागरिकांना अडवून सार्वजनिक शिष्टाचाराचा भंग केला. त्यामुळे परिसरात दहशत व अस्वस्थता निर्माण झाल्याचे पोलिस तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी अनैतिक व्यापारास प्रतिबंध अधिनियम १९५६ अंतर्गत कलम ८ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करीत आहेत.


