शबनम न्यूज | प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट)चे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती अचानक बिघडल्याची माहिती समोर आली आहे. गोविंद बाग येथून त्यांना खासगी कारमधून पुण्याच्या दिशेने हलवण्यात आलं असून रुबी या रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. यावेळी खासदार सुप्रिया सुळे आणि त्यांचे पती सदानंद सुळे हे देखील त्यांच्या सोबत आहेत अशीही माहिती मिळाली आहे.
शरद पवार यांना कफाचा त्रास होत असून श्वास घेण्यासही काही प्रमाणात समस्या उद्भवत आहेत. त्यामुळे शरद पवार यांना तातडीने गोविंदबाग बारामती या ठिकाणाहून पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटल या ठिकाणी हलवण्यात आलं आहे.
शरद पवार बारामती येथील त्यांच्या गोविंदबाग या निवासस्थानी होते. त्यांची प्रकृती अचान बिघडली. त्यांचा घसा दुखतो आहे तसंच कफाचाही त्रास जाणवतो आहे त्यामुळे त्यांना श्वास घ्यायला काही प्रमाणात त्रास होतो आहे. त्यांची प्रकृती जास्त बिघडल्याने त्यांना तातडीने पुण्यातल्या रुबी हॉल क्लिनिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. शरद पवारांचे पुतणे श्रीनिवाज पवार यांनी सांगितलं शरद पवार यांना होणारा कफाचा त्रास रविवारी रात्रीपासून वाढला आहे, त्यामुळेच त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.


