spot_img
spot_img
spot_img

हिरकणी मावळे रायडर्सचा वुई टुगेदर फाउंडेशन वतीने विशेष सत्कार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पर्यावरणाबद्दल जनजागृती व सायकलीच्या वापराबद्दल आरोग्याचे महत्त्व असे संकल्प घेऊन हिरकणी मावळे रायडरची टीम चिंचवड ते पुणे तुळजापूर मार्गे अक्कलकोट पर्यंत जवळपास ४०० किलोमीटरचा दिवस-रात्र सायकल प्रवास केला. यामध्ये दहा सायकलपट्टू सहभागी झाले होते महिला व पुरुष असा सहभाग होता अत्यंत खडतर असा हा प्रवास या सायकलपट्टूंनी अत्यंत जिद्दीने पार पाडला
वुई टुगेदर फाउंडेशनचे अध्यक्ष मधुकर बच्चे यांच्या पुढाकाराने या सायकलपट्टूंचा स्वामी समर्थ मठ चिंचवड येथे जाहीर सत्कार करण्यात आला
प्रज्ञा अजगर, सोनाली कदम, अपर्णा अष्टीकर, ऋतुजा शेटे ,हर्षल बोरकुले, मकरंद नरवडे, मुकुंद पाटे ,प्रदीप साळी, स्वराज गावडे ,दिनेश निकुंभ, आदीं सायकल स्वरांनी यात सहभाग घेतला होता.
ही जनजागृती मोहीम यशस्वी केल्याबद्दल वुई टुगेदर फाउंडेशनच्या वतीने या सर्व सायकलपटूंचा जाहीर सत्कार करण्यात आला
पोलीस फ्रेंड वेल्फेअर संस्थापक/ अध्यक्ष व स्वामी समर्थ मठाचे प्रमुख गजानन चिंचवडे हे या कार्यक्रमास अध्यक्ष म्हणून उपस्थित होते
वुई टुगेदर फाउंडेशन अध्यक्ष मधुकर बच्चे उपाध्यक्ष रवींद्र काळे, सचिव जयंत कुलकर्णी, सहसचिव मंगला डोळे- सपकाळे, खजिनदार दिलीप चक्रे, एडवोकेट विलास कडेकर ,
सल्लागार रवींद्र सागडे,खुशाल दुसाने, धनंजय मांडके, उल्हास दाते, अर्जुन पाटोळे, अपर्णा कुलकर्णी, सरिता कुलकर्णी, बाळासाहेब जगताप, श्रीनिवास जोशी आदींनी हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.
आम्ही केलेल्या पर्यावरण जनजागृती व सायकलचे आरोग्यासाठी महत्त्व या प्रवासाचे वुई टुगेदर फाउंडेशन च्या वतीने जो सत्कार, सन्मान केला त्याबद्दल अनेक सायकलपटूंनी आपल्या भावना व्यक्त केला आभार व्यक्त केले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!