spot_img
spot_img
spot_img

शहीद अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांची पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती

शबनम न्यूज | मुंबई

 मुंबईवर २६ नोहेंबर २००८ साली झालेल्या दहशतवादी हल्यात वीर मरण आलेल्या पोलीस शिपाई अंबादास पवार यांच्या पत्नी कल्पना पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षकपदी नियुक्ती देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज श्रीमती पवार यांना परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश प्रदान केले.

‘मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे नेतृत्व करत असताना त्यांनी सतत सर्वसामान्य जनतेला न्याय दिला आहे. राज्यातीला सर्वसामान्य जनतेच्या हिताचे निर्णय घेणारे व राज्यातील महिलांचे लाडके भाऊ असलेले मुख्यमंत्री फडणवीस यांनी शहीद पोलीस यांच्या पत्नीस थेट पोलीस उपअधीक्षक पदावरील थेट नियुक्तीचे आदेश दिल्याने त्यांची शहीदांप्रति असलेली संवेदनशीलता दिसून आली आहे, अशी भावना श्रीमती पवार यांनी मुख्यमंत्री व राज्य शासनाचे आभार मानताना व्यक्त केली.

पवार म्हणाल्या, ‘माझ्या पती प्रमाणेच मलाही देशसेवा करण्याची संधी दिली आहे. हे सरकार शेतकरी, कष्टकरी, लाडक्या बहिणी आणि देशाच्या रक्षणार्थ प्राणाचे बलीदान दिलेल्या शहीद वीरांचे आहे. हे माझ्या नियुक्तीतून पुन्हा एकदा सिद्ध होत आहे.’

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!