spot_img
spot_img
spot_img

‘एमआयटी एडीटी’त रक्तदान शिबिराला उदंड प्रतिसाद

शबनम न्यूज | पुणे

एमआयटी आर्ट, डिझाईन आणि टेक्नाॅलाॅजी विद्यापीठ, पुणे विद्यापीठाचे कार्याध्यक्ष प्रा.डाॅ.मंगेश तु.कराड यांच्या ५९व्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस) तर्फे आयोजित भव्य रक्तदान शिबिराला विद्यार्थी तसेच शिक्षक, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या शिबिरात तब्बल १११ दात्यांनी रक्तदान करून आपली सामाजिक बांधीलकी जपण्याचा प्रयत्न केला.

या रक्तदान शिबिराचे उद्घाटन विद्यापीठाचे कुलगुरू प्रा. डाॅ.राजेश एस. यांच्या हस्ते तर प्र.रामचंद्र पुजेरी, कुलसचिव डाॅ.महेश चोपडे, परीक्षा नियंत्रक डाॅ.ज्ञानदेव नीलवर्ण, डाॅ. रजनीश कौर सचदेव बेदी, डाॅ.विपुल दलाल, डाॅ.विरेंद्र शेटे, डाॅ.सुदर्शन सानप, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक प्रा.विशाल पाटील, प्रा.हनुमंत पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले.

याप्रसंगी बोलताना, डाॅ.राजेश एस. यांनी म्हटले की, प्रा.डाॅ.मंगेश कराड यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी विश्वराज बागेत विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात येते. यंदाही अनेक उपक्रमांद्वारे साहेबांचा वाढदिवस साजरा झाला. सकाळपासूनच विद्यार्थ्यांनी स्वयंस्पूर्तीने शिबिरस्थळी दाखल होत, रक्तदान केले. त्यामधून तब्बल १११ रक्त पिशव्या संकलित झाल्याचे कौतुक आणि तितकाच आनंद आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!