spot_img
spot_img
spot_img

विविधतेत एकता असलेला “एक भारत, श्रेष्ठ भारत” -राज्यपाल अर्लेकर

केंद्रीय पुणे नायर सर्व्हिस सोसायटीतर्फे स्नेह मेळावा

पिंपरी (प्रतिनिधी) आपण शाळेत शिकताना एक प्रतिज्ञा घेतो कि सारे भारतीय माझे बंधू-भगिनी आहे. मग आपली संस्कृती वेशभूषा, प्रांत वेगळा असला तरीही सर्व भारतीयांना आपण बंधू भगिनी समान मानतो , कारण आपण कोणत्याही राज्यातील असलो तरी आपण एक आहोत. सर्वप्रथम भारतीय आहोत. विविधतेत एकता असलेला आपला देश आहे.एक भारत- श्रेष्ठ भारत आहे.असे उदगार केरळचे राज्यपाल राजेंद्र अर्लेकर यांनी काढले.केंद्रीय पुणे नायर सर्व्हिस सोसायटीच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मळ्याळी नववर्षारंभा निमित्त (विशु कुटैमा) स्नेह मेळाव्यात ते बोलत होते.
यावेळी खासदार श्रीरंग आप्पा बारणे,आमदार शंकर जगताप, आ.उमा खापरे,आ.अमित गोरखे, मकरज्योतीग्रुप चे संचालक पीएसआर पिल्ले, आयोकी कंपनीचे संचालक गणेश कुमार,आयआयटी मुंबईचे एम एस उन्नीकृष्णन,के उन्नीकृष्णन, अध्यक्ष दिलीप नायर, सरचिटणीस मनोज पिल्ले,खजिनदार नंदकुमार एम.पी आदी मान्यवर उपस्थित होते.

( चौकटीत घेणे
केरळ राजभवनात महाराष्ट्र दिन होणार साजरा
केरळमधील मराठी बांधवाना राजभावनात बोलवून त्यांच्या समवेत महाराष्ट्र दिन साजरा करणार आहे. तुम्ही पुण्यात राहून मराठी भाषा शिकला ही आनंदाची बाब आहे.तसेच केरळ मधील मराठी बांधवांना देखील मळ्याळी भाषा शिकण्याचा आग्रह करेन. मी बिहार चा राज्यपाल बनल्यानंतर दिल्लीत गेलो होतो. तेव्हा मी बिहारी पोशाखात दिल्लीला गेलो होतो. तेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदीं यांनी, “आओ बिहारी बाबू” अशा शब्दात स्वागत केले होते.

यावेळी खासदार बारणे म्हणाले कि,पुणे स्थित मल्याळी बांधव आपली सण संस्कृती जपत आहे. आता तुम्ही केरळवासी नाही, तर पुणेवासी बनले आहात.
आ. गोरखे म्हणाले कि, मल्याळी बांधवांनी मराठी माणसासोबत चांगले संबंध प्रस्थापित केले आहे.मल्याळी बांधव प्रेमळ, सकारात्मक,ऐक्य जपणारा समाज आहे.मी सीएमएसचा पहिला विद्यार्थी असल्याने मल्याळी बांधवां सोबत घट्ट संबंधत झाले आहे.
आ. उमा खापरे यांनी काही समस्या असल्यास सांगावे.
यावेळी भरतनाट्यम, विल्लूपाटू, नृत्य,असे दक्षिणात्य कला कृती सादर केली.
यावेळी अध्यक्ष दिलीप नायर यांनी प्रास्ताविक केले. सरचिटणीस मनोज पिल्ले यांनी कार्य अहवाल सादर केला. सूत्रसंचालन विनिता नायर, दीप्ती नायर यांनी तर मनोज पिल्ले यांनी आभार मानले.

फोटो ओळ –
डावीकडून पीएसआर पिल्ले, उन्नी वाकनाड, उदघाटन करताना राज्यपाल राजेंद्र अर्लेकर, दिलीप नायर, मनोज पिल्ले, एम एस पिल्ले,एम एस उन्नीकृष्णन

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!