शबनम न्यूज | प्रतिनिधी
एकेमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून झालेल्या वादातून तिघांनी मिळून दोघांना बेल्टने मारहाण केली. ही घटना सोमवारी (दि. १९) रात्री वायसीएम रुग्णालयासमोर पिंपरी येथे घडली.
रोहन विजय सूर्यवंशी (३०, कासारवाडी), वैभव विजय चाबुकस्वार (३२, संत तुकारामनगर, पिंपरी) व शहबाज खान (२८, वाकड, पुणे) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत. शंकर ऊर्फ गट्टया संभाजी चौधरी (२६, यशवंतनगर, पिंपरी) यांनी संत तुकारामनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शंकर चौधरी हे त्यांच्या मित्र विशाल जाधव हे वायसीएम रुग्णालया समोर थांबले होते. त्यावेळी तिथे आरोपी आले. एकमेकांकडे पाहण्याच्या कारणावरून आरोपींनी शंकर आणि त्यांचा मित्र विशाल यांना बेल्टने बेदम मारहाण केली. यात फिर्यादी व त्यांच्या मित्रास दुखापत झाली. संत तुकारामनगर पोलीस तपास करीत आहेत.


