spot_img
spot_img
spot_img

Crime : पिंपरीत ज्येष्ठाची एक कोटींची फसवणूक

शबनम न्यूज | प्रतिनिधी

सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगत ज्येष्ठ नागरिकाला अटकेची भीती दाखवत विविध बँक खात्यांत पैसे वर्ग करण्यास भाग पाडून तब्बल एक कोटी रुपयांची आर्थिक फसवणूक केली. ही घटना ३० डिसेंबर २०२५ ते १४ जानेवारी २०२६ या कालावधीत चिंचवड येथे घडली.

याप्रकरणी ७७ वर्षीय ज्येष्ठ नागरिकाने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपींनी फिर्यादी यांना फोन केला. फोनवरील व्यक्तींनी ते सीबीआय मधून बोलत असल्याचे सांगितले.

एका व्यक्तीवर झालेल्या कारवाई मध्ये फिर्यादी यांचे बँक खाते आढळले असून ते मनी लॉन्डरिंग साठी वापरले आहे. त्या खात्याची लिगॅलिटी चेक करायची असून एक कोटी रुपये घेत आरोपीच्या नावाखाली बँक व म्युच्युअल फंडातील रक्कम विविध खात्यांत पाठवण्यास भाग पाडले. चौकशी पूर्ण झाल्यावर रक्कम परत मिळेल, असे आश्वासन देण्यात आले; मात्र एक कोटी रुपये परत न करता फिर्यादीची फसवणूक करण्यात आली. या प्रकरणाचा तपास सायबर पोलीस करत आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!