शबनम न्यूज | प्रतिनिधी
सोसायटी ऑफ ऑटोमोटिव्ह इंजिनियर्स या संस्थेने पीथमपुर येथील “एसएई इंडिया ई – बाहा २०२६” या राष्ट्रीय स्पर्धेत पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या (पीसीईटी) रावेत येथील पिंपरी चिंचवड कॉलेज ऑफ इंजीनियरिंग अँड रिचर्स च्या (पीसीसीओईआर) मेकॅनिकल विभागातील “टीम नॅशोर्न्स” ने दैदीप्यमान कामगिरी करीत एकूण ११ पदकांसह तीन लाख साठ हजार रुपयांचे पारितोषिक मिळवून देशात प्रथम क्रमांक पटकावला.
या स्पर्धेत देशभरातून शंभरपेक्षा अधिक अभियांत्रिकी महाविद्यालयांनी भाग घेतला होता.
पीसीसीओईआर च्या टीम नॅशोर्न्स ने टिकाऊपणा, उत्कृष्टतता, समग्र भौतिक गतिमान, निलंबन व संकर्षण अशा विविध विभागात प्रथम क्रमांक आणि स्टॅटिक, बौद्धिक, सीएइ या विभागांमध्ये तृतीय क्रमांक तसेच सर्वोत्कृष्ट पदार्पण पुरस्कार प्राप्त केला.
पीसीसीओईआरच्या विद्यार्थ्यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत पदार्पणातच राष्ट्रीय पातळीवरील प्रथम क्रमांक पटकावून महाविद्यालयाच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला आहे. या टीम मधील सर्व विद्यार्थी, त्यांचे मार्गदर्शक, प्राचार्य, समन्वयक यांनी एकत्रित पणे केलेले प्रयत्न आणि पीसीईटीच्या व्यवस्थापनाने उपलब्ध करून दिलेल्या पायाभूत सुविधांमुळे हा सुवर्ण क्षण पहायला मिळाला आहे असे गौरवउद्गार पीसीईटीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे यांनी यावेळी काढले.
पीसीसीओईआर मधील विद्यार्थी कर्णधार सौरभ पाटील, उपकर्णधार महेंद्र कुंभार, चालक साजिद मुलानी, पृथ्वीराज पाटील, अखिलेश वांजपेय, देवेंद्र पाटील, ओंकार शेजवळ, धीरज पाटील, ऑस्टिन जॉर्ज, हेमंत पाटील, पार्थ पांदेकर, जय पगारे, रश्मीत गोयल, श्रीकृष्णा माने, विश्वजीत पाटील, प्रणव कांबळे, विश्वजीत कोल्हे, दिशांत पिपरे, श्रीरंग नायर, सोहम शेलार, आयुष पाटील, समरजीत तानपुरे, आदित्य माने, आणि ओम बडे या विद्यार्थ्यांनी यामध्ये सहभाग घेतला होता.
प्राचार्य डॉ. हरीश तिवारी, विभाग प्रमुख डॉ. गुलाब सिरसकर, प्रा. सुखदीप चौगुले, सुजित चौधरी यांनी मार्गदर्शन केले.
पिंपरी चिंचवड एज्युकेशन ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्माताई भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, उद्योजक नरेंद्र लांडगे, अजिंक्य काळभोर, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई, पीसीसीओईआर चे संचालक प्राचार्य डॉ. हरीश तिवारी यांनी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या.


