शबनम न्यूज | प्रतिनिधी
पुनावळे येथे अग्निशमन दलाच्या गाडीने दुचाकीला धडक दिल्याने झालेल्या अपघातात एका तरुणाचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला. ही घटना शुक्रवारी (दि. १६) सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास गायकवाड नगर, पुनावळे येथे घडली.
समीर नेहाल खान (वय २८) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. या प्रकरणात मुरलीधर कुमार (वय २०, तुकाराम नगर, तळवडे) यांनी रावेत पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी फायर फायटर चालक वैभव रमेश कोरडे (वय ३२, कोलते पाटील मारुंजी फायर स्टेशन क्वार्टर, मुळशी) याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आरोपी चालकाने अग्निशमन दलाची गाडी बेदरकारपणे चालवून त्यांच्या दुचाकीला धडक दिली. अपघातात समीर खान याचा मृत्यू झाला.


