spot_img
spot_img
spot_img

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते सोमवारी ६० पिंक ई- रिक्षा वितरीत

पुणे  : महिला व बाल विकास विभागाच्या वतीने पुणे जिल्ह्यासाठी ४ हजार महिलांना “पिंक ई- रिक्षा ” वाटप करण्याचे उदिदष्ट दिलेले असुन पुणे जिल्हयात २० ते ५०वर्षे वयोगटातील ३ हजार २३० इच्छुक महिलांचे अर्ज प्राप्त झालेले आहेत. त्यापैकी जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखालील गठीत समितीने 1 हजार ७२६ लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. यापैकी पहिल्या टप्प्यातील ६० लाभार्थी महिलांना २१ एप्रिल २०२५ रोजी, सकाळी ११ वाजता कृषी महाविद्यालय, शिवाजीनगर, पुणे येथे उप मुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ६० कायनेटिक ग्रिन कंपनीचे “पिंक ई- रिक्षा” वितरीत करण्यात येणार आहे.

या कार्यक्रमास महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे, महिला व बाल विकास राज्यमंत्री मेघना साकोरे बोर्डीकर, महिला व बाल विकास विभाग सचिव डॉ. अनुपकुमार यादव , विभागीय आयुक्त डॉ. चंद्रकांत पुलकुंडवार, आयुक्त महिला व बाल विकास नयना गुंडे, पुणे महानगरपालिका आयुक्त डॉ. राजेंद्र भोसले, पिंपरी चिंचवड महानगरपालिका आयुक्त शेखर सिंग , जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी,मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील उपस्थित राहणार आहे.

महिला व बाल विकास विभागाच्या वतीने आठ जिल्हयातील महिला व मुलींना रोजगार निर्मितीस चालना देणे त्यांचे आर्थिक, सामाजिक पुनर्वसन करणे, स्वावलंबी, आत्मनिर्भर करणे, सशक्तीकरणास चालना देण्यासाठी तसेच महिला व मुली यांना सुरक्षित प्रवास करणे यासाठी शहरात इच्छुक महिलांना पिंक रिक्षा खरेदी करण्यासाठी अर्थसहाय्य व रिक्षा चालविण्यासाठी इतर सोई सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी राज्यातील गरजू महिलांना रोजगारासाठी “पिंक ई- रिक्षा ” योजना सुरू करण्यात आलेली आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!