spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रीय मराठा पार्टीचा पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणुकीत भाजपाला अधिकृत पाठिंबा

शबनम न्यूज , प्रतिनिधी :

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ च्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय मराठा पार्टीने भारतीय जनता पक्षाला अधिकृत पाठिंब्याचे पत्र दिले. हे पाठिंब्याचे पत्र उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील, भोसरी विधानसभा आमदार महेश लांडगे, पिंपरी-चिंचवड महापालिका निवडणूक प्रमुख आमदार श्री. शंकरशेठ जगताप आणि पिंपरी-चिंचवड शहर जिल्हाध्यक्ष शत्रुघ्न काटे यांच्या उपस्थितीत देण्यात आले.

यावेळी राष्ट्रीय मराठा पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर, राष्ट्रीय उपाध्यक्ष परमेश्वर देशमुख, महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष , बालाजीराव पाटील देरेगावकर तसेच पुणे शहर जिल्हाध्यक्ष ,ज्योतीबा सावंत उपस्थित होते. या कार्यक्रमात पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणूक २०२६ मध्ये भाजपाच्या सर्व अधिकृत उमेदवारांना राष्ट्रीय मराठा पार्टीचा जाहीर पाठिंबा असल्याची घोषणा करण्यात आली.भाजप शहराध्यक्ष शत्रुघ्न काटे , सामाजिक कार्यकर्ते संजय भिसे , यांच्या सह भाजप पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

 

याप्रसंगी बोलताना अंकुशराव शिवाजीराव पाटील होनाळीकर यांनी पिंपरी-चिंचवड शहराच्या सर्वांगीण आणि गतिमान विकासासाठी भाजपाचे नेतृत्व आवश्यक असल्याचे नमूद केले. तसेच महानगरपालिका क्षेत्रातील मतदार बांधव-भगिनींनी भाजपाच्या अधिकृत उमेदवारांना मतदान करून प्रचंड बहुमताने विजयी करावे, असे आवाहन त्यांनी केले.

या निर्णयामुळे पिंपरी-चिंचवडच्या राजकीय समीकरणात भाजपाची ताकद अधिक मजबूत होणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!