spot_img
spot_img
spot_img

वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या रस्ता सुरक्षा मार्गदर्शक पुस्तिकेचे प्रकाशन

अपघात रोखण्यासाठी वर्षभर रस्ता सुरक्षा जनजागृतीची गरज – उपमुख्यमंत्री अजित पवार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूल यांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या ‘रस्ता सुरक्षा मार्गदर्शक’ या पुस्तिकेचे प्रकाशन राज्याचे उपमुख्यमंत्री व पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांच्या हस्ते नुकतेच पिंपरी-चिंचवड येथे पार पडले. या कार्यक्रमाला पिंपरी-चिंचवड शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष योगेश बहल, कार्याध्यक्ष फजल शेख, पदवीधर शहर अध्यक्ष प्रदीप औटी, वाहतूक कार्याध्यक्ष अकबर शेख, स्वप्निलचव्हाण, बबन शेठ मिसाळ, विश्वासजी टेंगळे तसेच वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विनोदभाऊ वरखडे, संतोष शेठ मायने, टहल महतो आणि विनोद वरखडे मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी रस्ता सुरक्षेचे महत्त्व अधोरेखित करत सांगितले की, “वाहतूक नियमांचे पालन, सुरक्षित वाहनचालना आणि जनजागृती यामुळेच अपघातांचे प्रमाण कमी होऊ शकते. अशा मार्गदर्शक पुस्तिका नव्या वाहनचालकांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी अत्यंत उपयुक्त ठरतील.” शासनाच्या विविध विभागांनी, खासगी संस्था व सामाजिक संघटनांनी एकत्र येऊन रस्ता सुरक्षेसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहनही त्यांनी केले.

वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूलचे संचालक विनोदभाऊ वरखडे यांनी आपले मनोगत व्यक्त करताना सांगितले की, “रस्ता सुरक्षा ही केवळ एका आठवड्यापुरती मर्यादित न ठेवता वर्षभर सातत्याने राबवली पाहिजे. त्यामुळे लहान वयापासूनच नागरिकांमध्ये वाहतूक नियमांबाबत जनजागृती होईल आणि अपघातांचे प्रमाण लक्षणीयरीत्या कमी होईल.” शाळा, महाविद्यालये, औद्योगिक क्षेत्र आणि सार्वजनिक ठिकाणी नियमित प्रशिक्षण शिबिरे घेण्याची गरज त्यांनी अधोरेखित केली.

या मार्गदर्शक पुस्तिकेमध्ये सुरक्षित वाहनचालनाचे नियम, हेल्मेट व सीट बेल्टचे महत्त्व, वेगमर्यादा, सिग्नल पालन, पादचाऱ्यांची सुरक्षितता, आपत्कालीन परिस्थितीत घ्यावयाची काळजी तसेच अपघातानंतरची प्राथमिक मदत याबाबत सविस्तर माहिती देण्यात आली आहे. विशेषतः नवोदित वाहनचालकांसाठी ही पुस्तिका मार्गदर्शक ठरेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला.

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी वेदांत मोटर ड्रायव्हिंग स्कूलच्या या उपक्रमाचे कौतुक करत रस्ता सुरक्षेसाठी असे उपक्रम अधिक व्यापक स्वरूपात राबविण्याची गरज असल्याचे मत व्यक्त केले. मोठ्या संख्येने उपस्थित नागरिकांनीही या उपक्रमास सकारात्मक प्रतिसाद दिला.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!