खासदार ओमदादा राजे निंबाळकर व आमदार कैलासदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने प्रभाग क्रमांक १ मध्ये भव्य ‘विजयी संकल्प सभा’ आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रविवार, दिनांक ११ जानेवारी २०२६ रोजी दुपारी ४ वाजता चिखली येथील सानेचौक येथे संपन्न होणार आहे.
या विजयी संकल्प सभेला लोकप्रिय खासदार ओमदादा राजे निंबाळकर आणि लोकप्रिय आमदार कैलासदादा पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, त्यांच्या मार्गदर्शनामुळे सभेला विशेष राजकीय महत्त्व प्राप्त झाले आहे. शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांची उपस्थिती आणि कार्यकर्त्यांचा उत्साह पाहता या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रभाग क्रमांक १ मधील अधिकृत उमेदवार जरे विजय गोविंद यांच्या प्रचारासाठी ही सभा निर्णायक ठरण्याची शक्यता आहे. ‘मशाल’ या निवडणूक चिन्हावर मतदान करून मोठ्या मताधिक्याने विजयी करण्याचे आवाहन यावेळी करण्यात येणार आहे.
जरे विजय गोविंद हे सामाजिक कार्यात सक्रिय असून स्थानिक प्रश्नांवर सातत्याने आवाज उठवत आले आहेत. नागरिकांच्या मूलभूत समस्या, पायाभूत सुविधा, स्वच्छता, पाणीपुरवठा, रस्ते, आरोग्य आणि युवकांसाठी रोजगार या मुद्द्यांवर त्यांचा भर राहिला आहे.
या विजयी संकल्प सभेमुळे प्रभाग क्रमांक १ मधील प्रचाराला मोठी गती मिळाली असून शिवसैनिकांमध्ये नवचैतन्य निर्माण झाले आहे. “अवघे… अवघे या..!” या आवाहनाने नागरिकांना मोठ्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे निमंत्रण देण्यात आले आहे.
दरम्यान, महानगरपालिका निवडणुकीचे मतदान सोमवार, दिनांक १५ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० वाजेपर्यंत होणार असून, शिवसेनेच्या ‘मशाल’ चिन्हासमोर बटण दाबून जरे विजय गोविंद यांना विजयी करण्याचे आवाहन शिवसेना पदाधिकारी व कार्यकर्त्यांकडून करण्यात येत आहे.
या सभेमुळे प्रभाग क्रमांक १ मधील राजकीय वातावरण अधिक तापले असून, येत्या निवडणुकीत चुरशीची लढत पाहायला मिळणार असल्याचे संकेत मिळत आहेत.


