पिंपरी-चिंचवड | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ५ मधील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांची भव्य विजयी निर्धार सभा आयोजित करण्यात आली आहे. ही सभा रविवार, दिनांक ११ जानेवारी रोजी सायंकाळी ६ वाजता डॉ. बाबासाहेब आंबेडकर गार्डनजवळील मैदान, दिघी रोड, भोसरी येथे संपन्न होणार आहे.
प्रभाग क्रमांक ५ मधून माजी नगरसेविका प्रियंका प्रवीण बारसे, माजी नगरसेविका भीमाताई फुगे, अमर फुगे आणि राहुल गवळी हे चार उमेदवार राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरले आहेत. आतापर्यंत झालेल्या प्रचारातून राष्ट्रवादी काँग्रेसने प्रभाग क्रमांक ५ मध्ये फिनिक्स पक्ष्यासारखी दमदार भरारी घेतल्याचे चित्र दिसून येत असून, मोठ्या प्रमाणात सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.
यंदाच्या निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ मध्ये परिवर्तन निश्चित असून, राष्ट्रवादी काँग्रेसचाच विजय होणार, असा ठाम विश्वास कार्यकर्ते व पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त केला जात आहे. ही सभा केवळ प्रचाराची नसून, चारही उमेदवारांच्या विजयाचा निर्धार व्यक्त करणारी ऐतिहासिक सभा ठरणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
या विजयी निर्धार सभेला उपमुख्यमंत्री अजित पवार यांची प्रमुख उपस्थिती लाभणार असून, प्रभाग क्रमांक ५ मधील जास्तीत जास्त मतदारांनी या सभेला उपस्थित राहावे, असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने करण्यात आले आहे.


