शबनम न्यूज | प्रतिनिधी
स्वच्छ व सुंदर पिंपरी साठी प्रभाग क्रमांक 21 मधून राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन माजी उपमहापौर तथा प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार डब्बू आसवानी यांनी येथे केले.
पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे निकिता कदम यांच्या प्रचारार्थ पिंपरी कॅम्पातील सी ब्लॉक, शनी मंदिर वैष्णव देवी परिसर या भागात प्रचार फेरी काढण्यात आली . या प्रचारफेरीस नागरिकांचा उदंड प्रतिसाद लाभला.
या प्रचारफेरीत पिंपरी गाव प्रभाग क्रमांक 21 मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवाणी, प्रियंका कुदळे, निकिता कदम, पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे हनुमंत नेवाळे,श्रीरंग शिंदे, मीना नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे,कल्पना घाडगे, ज्योती साठे,अनिता मोईकर , सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, शेखर अहिरराव, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव,प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी,रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज, सुरेश परदेशी,अजय गुप्ता, नीरज चावला आदी सहभागी झाले होते .
यावेळी डब्बू आसवानी म्हणाले की, मी उपमहापौर असताना तसेच नगरसेवक पदाच्या काळात कार्यक्षम नगरसेवक संदीप वाघेरे यांच्यासोबत काम करताना प्रभागातील काँक्रीटचे रस्ते, सबवे ही कामे केली. पिंपरी गाव,कुदळे कॉलनी या भागात पाण्याचे नवे कनेक्शन जोडले. मिलिंद नगर जवळील स्मशान भूमीत गॅस दाहिनी सुविधा पूर्ण होण्याच्या मार्गावर आहे. केवळ निवडणूक आचारसंहितेमुळे त्याचे उद्घाटन लांबले आहे. येत्या पाच वर्षात मतदार संघातील सर्व रस्ते सिमेंट काँक्रीटचे करण्याचा विचार आहे . एकूणच प्रभागाचा कायापालट करायचा आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपूर्ण पॅनेलला विजयी करण्याचे आवाहन आसवानी यांनी केले.
यावेळी बोलताना संदीप वाघेरे यांनी सन 2017 मध्ये महापालिकेवर निवड झाल्यापासून केलेल्या विविध विकास कामांचा आढावा घेतला. मिलिटरी डेअरी फार्म येथे करण्यात आलेले 6000 वृक्षांचे रोपण, डेरी फार्म उड्डाणपुलाचा मार्गी लावलेला प्रश्न, पवना सुधारसाठी केलेली धडपड, पूर्णत्वास नेलेले छत्रपती शिवाजी महाराज स्मारक, पिंपरी गावचे ग्रामदैवत श्री काळभैरवनाथ मंदिराचे नूतनीकरण, पिंपरी वाघेरे गाव ते पिंपळे सौदागर दरम्यान नदीवरील पुलाचे रुंदीकरण, कोरोना काळात जिजामाता रुग्णालयासाठी दिलेली वैद्यकीय उपकरणांची मदत याचा उल्लेख त्यांनी केला.


