spot_img
spot_img
spot_img

प्रभाग १९ मधील भाजपच्या उमेदवारांनी साधला संघ शाखेतील ज्येष्ठांसोबत संवाद; ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाने प्रचाराला गती

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या रणधुमाळीत जनसंपर्क मोहिमेवर भर देत असतानाच, प्रभाग १९ मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार शितल उर्फ विजय शिंदे, मधुरा शिंदे आणि मंदार देशपांडे यांनी आज सकाळी क्वीन्स टाऊन परिसरातील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या प्रभात शाखेला सदिच्छा भेट दिली. या भेटीदरम्यान उमेदवारांनी संघाच्या ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचे मार्गदर्शन घेतले आणि विजयासाठी शुभाशीर्वाद प्राप्त केले.

सकाळी शाखेचा दैनंदिन कार्यक्रम संपन्न झाल्यानंतर उमेदवारांनी सर्व स्वयंसेवकांशी वैयक्तिक संवाद साधला. यावेळी शितल उर्फ विजय शिंदे यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, संघाची शिस्त आणि राष्ट्रवादाची विचारधारा ही त्यांना नेहमीच प्रेरणा देत आली आहे. निवडणुकीच्या रिंगणात उतरताना केवळ मतांचे गणित महत्त्वाचे नसून समाजातील अनुभवी आणि ज्येष्ठ व्यक्तींचे मार्गदर्शन पाठीशी असणे आवश्यक असते, म्हणूनच आज शाखेला भेट देऊन ज्येष्ठांचे आशीर्वाद घेतल्याचे त्यांनी नमूद केले.

याप्रसंगी मधुरा शिंदे आणि मंदार देशपांडे यांनी देखील उपस्थितांशी विविध विषयांवर सविस्तर चर्चा केली. यामध्ये प्रामुख्याने प्रभागातील प्रलंबित नागरी प्रश्न, नागरिकांच्या वाढत्या अपेक्षा आणि प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी आवश्यक असणारे उपक्रम यांवर सकारात्मक चर्चा झाली. शाखेतील ज्येष्ठ पदाधिकाऱ्यांनी उमेदवारांना केवळ राजकीय कारकीर्द न घडवता सामाजिक बांधिलकी जपण्याचा आणि जनसेवेचे व्रत प्रामाणिकपणे पार पाडण्याचा मोलाचा सल्ला दिला. या सदिच्छा भेटीच्या वेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे स्थानिक पदाधिकारी, प्रभागातील प्रतिष्ठित नागरिक आणि मोठ्या संख्येने स्वयंसेवक उपस्थित होते. अत्यंत शिस्तबद्ध आणि सौहार्दपूर्ण वातावरणात पार पडलेल्या या भेटीत निवडणूक आचारसंहितेच्या नियमांचे पूर्णतः पालन करण्यात आले. कोणत्याही प्रकारची राजकीय घोषणाबाजी न करता केवळ सदिच्छा भेट आणि मार्गदर्शन यावरच या भेटीत भर देण्यात आला होता. उमेदवारांनी घेतलेली ही धावती भेट सध्या प्रभाग १९ मधील राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेचा विषय ठरली असून, त्यांच्या जनसंपर्क मोहिमेतील हा एक महत्त्वपूर्ण टप्पा मानला जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!