शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी गावातील प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला मोठी गती मिळाली असून, राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ काढण्यात आलेल्या भव्य बाईक रॅलीला मतदारांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रॅलीमुळे संपूर्ण पिंपरी गावात राष्ट्रवादीच्या प्रचाराचे वातावरण निर्माण झाले होते.
प्रभाग क्रमांक २१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे अधिकृत उमेदवार हिरानंद उर्फ डब्बू आसवानी, संदीप वाघेरे, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांच्या प्रचारासाठी आज ही बाईक रॅली आयोजित करण्यात आली होती. रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज चौक येथून झाली. त्यानंतर वाळुंजकर आळी, वाघेरे कॉलनी-१, वाघेरे कॉलनी-४, पवना आळी, मिलिंद नगर, रिव्हर रोड, शगुन चौक, साई चौक, वैष्णवीदेवी मंदिर, डब्बू आसवानी कार्यालय, म्हाडा, भैरवनाथ नगर, भीमनगर, नवमहाराष्ट्र शाळा, पॉवर हाऊस चौक, वैभव नगर, संजय गांधी नगर, अशोक थिएटर, गणेश हॉटेल, जगदंबा स्वीट आदी मार्गांवरून रॅली काढण्यात आली.
या बाईक रॅलीदरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसच्या घोषणा, पक्षाचे झेंडे आणि कार्यकर्त्यांचा जोश यामुळे परिसर दुमदुमून गेला होता. ठिकठिकाणी नागरिकांनी रॅलीचे स्वागत करत उमेदवारांना पाठिंबा दर्शवला. युवकांचा या रॅलीत विशेष सहभाग दिसून आला.
या रॅलीत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे, निकिता कदम यांच्यासह पीसीएमटीचे माजी सभापती संतोष कुदळे, माजी नगरसेवक रंगनाथ कुदळे, हनुमंत नेवाळे, श्रीरंग शिंदे, मीनाताई नानेकर, गिरिजा कुदळे, रुपेश कुदळे, कल्पना घाडगे, ज्योती साठे, अनिता मोईकर, सोनाली कुदळे, माधुरी कुदळे तसेच राकेश मोरे, गणेश कुदळे, कुणाल सातव, रवींद्र कदम, अमोल गव्हाणे, बाळासाहेब रोकडे, विष्णू माने, सतीश घोडेराव, प्रफुल्ल ओव्हाळ, अनिल जोगदंड, सुनील जगताप, रमेश मीराणी, किचू बन्साळी, रमेश बजाज, हरेश चुगानी, घनश्याम बजाज, सुरेश परदेशी, अजय गुप्ता, नीरज चावला आदी पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.
यावेळी उमेदवारांनी नागरिकांशी संवाद साधत प्रभागाच्या विकासाचा आराखडा मांडला. पाणीपुरवठा, रस्ते, ड्रेनेज, स्वच्छता, वाहतूक नियोजन, युवकांसाठी सुविधा आणि नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांवर प्राधान्याने काम करण्याची ग्वाही उमेदवारांनी दिली.
एकूणच पिंपरी गावातील या भव्य बाईक रॅलीला मिळालेला उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता, प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचाराला अधिक बळ मिळाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.


