पिंपरी गाव प्रभाग २१ मध्ये प्रचाराला अनोखा रंग, मतदारांचे लक्ष वेधले
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पिंपरी गाव प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिकृत पॅनेलचा प्रचार जोरदारपणे सुरू असून या प्रचाराला आता लोककलेचा आणि सामाजिक ऋणानुबंधाचा अनोखा रंग लाभला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संदीप वाघेरे, डब्बू आसवानी, प्रियंका कुदळे आणि निकिता कदम यांचा प्रचार दिवसेंदिवस वेग घेत असून मतदारांचा मोठा आणि सकारात्मक प्रतिसाद मिळताना दिसत आहे.
प्रचारफेरीदरम्यान महिलावर्ग मोठ्या उत्साहात सहभागी होत असून संदीप वाघेरे यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी पॅनेलमधील उमेदवारांचे औक्षण करून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. घराघरांतून मिळणारा हा प्रतिसाद राष्ट्रवादी पॅनेलच्या विजयाचा आत्मविश्वास वाढवणारा ठरत आहे.
दरम्यान, या प्रचाराला विशेष लक्ष वेधून घेणारा आणि कुतूहलाचा विषय ठरलेला प्रकार म्हणजे वासुदेवांची अनोखी हजेरी.
“आला रे आला वासुदेव आला,
ठेऊ ध्यानात सारे चला,
संदीपभाऊंच्या कार्याला,
हे पटलंय मनाला…
मतदान करू घड्याळाला,
हे पटलंय मनाला,
मतदान संदीप भाऊला…”
अशा लोकगीतातून वासुदेव राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलसाठी प्रचार करत असून परिसरात हा प्रचार नागरिकांचे लक्ष वेधून घेत आहे.
विशेष बाब म्हणजे हे वासुदेव बीड-बार्शी परिसरातून पिंपरीत दाखल झाले आहेत. बीड-बार्शी भागात उद्भवलेल्या आपत्तीच्या काळात संदीप वाघेरे यांनी अन्नधान्य वाटप करून गरजू नागरिकांना मदत केली होती. त्या मदतीची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आणि “माणुसकीची परतफेड” म्हणून हे वासुदेव आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात सहभागी झाले आहेत.
“संदीप वाघेरे यांनी संकटाच्या काळात आमच्या मदतीला धाव घेतली, त्यामुळे आज त्यांच्या विजयासाठी आम्ही प्रचार करत आहोत,” अशी भावना वासुदेव व्यक्त करत आहेत. त्यांच्या या सहभागामुळे प्रचाराला सामाजिक बांधिलकीचे आणि माणुसकीचे अधिष्ठान लाभले असून नागरिकांमध्ये याची विशेष चर्चा होत आहे.
लोककला, सामाजिक ऋणानुबंध आणि विकासाचा मुद्दा यांची सांगड घालणारा हा प्रचार प्रभाग क्रमांक २१ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेससाठी पोषक वातावरण निर्माण करत असल्याचे चित्र दिसून येत आहे. वासुदेवांच्या या अनोख्या प्रचारामुळे राष्ट्रवादीच्या पॅनेलला मतदारांचा आणखी पाठिंबा मिळत असल्याचे स्पष्ट होत असून निवडणूक प्रचारात हा प्रकार चर्चेचा विषय ठरत आहे.


