डोअर टू डोअर प्रचारावर भर: निवडणुकीची रंगत वाढली
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रभाग क्र. 26 मधील भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार ॲड. विनायक गायकवाड, आरती चोंधे, स्नेहा कलाटे, संदीप कस्पटे यांच्या प्रचारार्थ भव्य पदयात्रा पार पडली. उमेदवारांनी ‘डोअर टू डोअर’ प्रचारावर विशेष भर दिला. त्याला मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने प्रचार यंत्रणा राबवत वाकड परिसरातील गल्ल्या, कॉलण्या पिंजून काढल्या.
नागरिकांशी संवाद साधतानाच प्रभागाच्या शाश्वत विकासाची हामी दिली. मतदारांनी उमेदवारांना प्रचंड प्रेम आणि आशीर्वाद देत विजयासाठी भरभरून शुभेच्छा दिल्या. पदयात्रेत पक्षाच्या महिला कार्यकर्त्या व ज्येष्ठ मोठ्या संख्येने सहभागी झाल होते.
सकाळी दहा वाजता पदयात्रेस प्रारंभ झाला. त्याअंतर्गत वाकड परिसरातील शेडगे वस्ती, भाऊसाहेब कलाटेनगर, शेख वस्ती, नंदनवन कॉलनी तसेच दत्त मंदिरलगतच्या परिसरातील आप्त- स्वकीयांची भेट घेतली. यावेळी समस्त महिला मतदारांनी औक्षण करून उमेदवारांप्रति प्रेम व जिव्हाळा व्यक्त केला. ज्येष्ठ नागरिकांनी आशीर्वाद देऊन विजयाची मनोकामना व्यक्त केली. या दरम्यान प्रथम इस्टेट, राधाई हाईट्स, पारस विस्टा, अलायन्स निसर्ग लीला सोसायटीतील नागरिकांशी संवाद साधत भाजपच्या सत्ताकाळात केलेल्या विकासकामांची माहिती दिली. प्रभागातील सुविधा भक्कम करण्यासाठी पक्षाने उभारलेल्या विविध नागरी प्रकल्पांची माहिती दिली. प्रभागाच्या भविष्याचा विचार करून सर्वांगीण, शाश्वत विकासाचा संकल्प केला असून त्यादृष्टीने मार्गक्रमण सुरू असल्याचे सांगितले.


