spot_img
spot_img
spot_img

आंतरराष्ट्रीय माध्यम परिषदेत डॉ. वृषाली बर्गे यांचा शोधनिबंध सादर

शबनम न्यूज | पुणे

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागातील सहायक प्राध्यापक डॉ. वृषाली बर्गे यांनी बँकॉकमध्ये नुकत्याच झालेल्या १० व्या जागतिक माध्यम आणि जनसंवाद परिषदेत संशोधन सादर केले. प्रसिद्ध उद्योजक बिल गेट्स आणि नागपूरचा लोकप्रिय चहा विक्रेता डॉली चायवाला यांच्या भेटीच्या सोशल मीडियावरील प्रभावाचे विश्लेषण त्यांनी शोधनिबंधात मांडले.

त्यांच्या शोधनिबंधाचे शीर्षक ‘ऑर्केस्ट्रेटेड स्ट्रॅटेजिक सोशल मीडिया ‘गेट्स-चायवाला’ पीआर को-लॅबोरेशन: अ केस स्टडी ऑफ बिल गेट्स, गेट्स आणि चहा विक्रेता डॉली चायवाला यांच्या भेटीच्या सोशल मीडियावरील प्रभावाचे विश्लेषण बिलियनेअर्स एंगेजमेंट विथ अ लोकल स्ट्रीट टी वेंडर डॉली चायवाला इन इंडिया’ आहे.

संशोधनात या भेटीमुळे सोशल मीडियावर निर्माण झालेल्या व्यापक प्रतिसादांचे त्यांनी विस्तृत विश्लेषण केले आहे. यात विविध व्यासपीठांवरील पोस्ट्स, त्यावरील वापरकर्त्याच्या प्रतिक्रिया, लोकांचा भावनिक प्रतिसाद आणि प्रसारमाध्यमांनी दिलेले कव्हरेज यांचा समावेश करण्यात आला. प्रतिष्ठित मेडकॉम २०२५ परिषदेत हे संशोधन सादर करणे हा शैक्षणिक कारकिर्दीतील एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड असल्याचे मत डॉ. वृषाली बर्गे यांनी व्यक्त केले. गेट्स-चायवाला प्रकरण हे सोशल मीडियाच्या बदलत्या शक्तीचे, विविध समाज क्षमतेचे ज्वलंत उदाहरण आहे.

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!