प्रभाग २६ मधील पदयात्रेला अथांग जनसागर
शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रभागाच्या एकूण विकासाच्या ध्येयानेच आम्ही सर्वजण एकत्र आलो आहोत. यापुढील काळात प्रभागाचा धोरणात्मक विकास निश्चितच करू, अशी ग्वाही प्रभाग क्रमांक 26 च्या भाजपा उमेदवारांनी मंगळवारी( दि ६) मतदारांना
दिली.
पिंपळे निलखचे ग्रामदैवत असलेल्या भैरवनाथ त्याबरोबरच विठ्ठल रुख्मिणी व प्रभू श्री. रामचंद्रांचे आशीर्वाद घेऊन भारतीय जनता पक्षाचे अधिकृत उमेदवार संदीप कस्पटे, स्नेहा कलाटे, ऍड. विनायक गायकवाड आणि आरती चोंधे यांनी पॅनेलच्या विजयाचे साकडे घातले. याचवेळी प्रचाराच्या पदयात्रेचा शुभारंभ झाल्याची घोषणा केली.
यावेळी सचिन साठे,माजी नगरसेवक धनराज बिर्दा संतोष कलाटे, काळुराम नांदगुडे, भुलेश्वर नांदगुडे, नंदू बालवडकर, गणेश काटे, नागेश जाधव,रामभाऊ साठे, रवी काटे, विनायक बोडके, रामदास कस्पटे,प्रकाश कामठे, सुदाम कामठे, संतोष साठे,रमन कामठे, माऊली साठे, विजय पाटुकले, अनिल संचेती, शशिकांत साठे, दत्तात्रेय पवार, भैरव साठे, विष्णू कस्पटे, भाऊसाहेब धरपळे, अभिषेक मानकर, अभिजित मानकर, राहुल मानकर.यांच्यासह पक्षाचे कार्यकर्ते व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
छत्रपती शिवाजी महाराजांचा जयघोष, फटाक्यांची अतिशबाजी, ढोल- तशाचा गजर व जोडीला कार्यकर्त्यांचा उत्साह, अशा वातावरणात मतदारांनी स्वयंस्फूर्तीने प्रचाराची रणधुमाळी अनुभवली.
मागील निवडणुकीत ग्रामस्थांनी भाजपच्या पॅनलला मताधिक्याने निवडून दिले होते. यावेळी देखील प्रचंड मताधिक्याने विजयी करतील अशी खात्री उमेदवार ऍड.विनायक गायकवाड यांनी व्यक्त केली.
संदीप कस्पटे यांनी मतदारांना आशीर्वादासाठी आर्त साद घातली. स्नेहा कलाटे यांनी विकासाच्या धोरणनुसार आमच्या हातून कार्य घडो, अशी ईश्वरचरणी प्रार्थना केली. त्या म्हणाल्या, मतदारांचा आमच्यावरील विश्वास यंदाही कायम राहील, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पॅनेलला व्यापारी संघटनेचा जाहीर पाठिंबा..
प्रभाग क्रमांक २६ मधील भारतीय जनता पक्षाच्या चारही अधिकृत उमेदवारांना वाकड येथील कस्पटेवस्ती परिसरातील व्यावसायिक संघटनेने (शॉप किपर असोसिएशन) एकमुखी जाहीर पाठिंबा दिला. व्यापारी वर्गाचा हा पाठिंबा भाजपच्या उमेदवारांना बळ देणारा आणि निर्णायक ठरणारा मानला जात आहे. व्यापारी असोसिएशनच्या निवेदनावर संघटनेचे संस्थापक अध्यक्ष संतोष कस्पटे, सचिव सुधीर धावडे, खजिनदार अपूर्वा देशमुख यांच्यासह कार्यकारिणीतील इतर पदाधिकाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
” व्यवसायासाठी अनुकूल वातावरण निर्माण करून दुकानदार व ग्राहक यांच्यातील नाते घट्ट करून हितसंबंध अधिक दृढ करण्याचे काम या चारही उमेदवारांनी केले.त्यामुळे आम्ही एकमुखी पाठींबा दिला.
( एक व्यापारी )


