spot_img
spot_img
spot_img

निवडणूक शांततेत व सुरळित पार पाडण्यासाठी समन्वयाने काम करा

शबनम न्यूज | प्रतिनिधी

आगामी महापालिका निवडणूक शांततापूर्णनिर्भय आणि पारदर्शक वातावरणात पार पाडण्यासाठी प्रशासनातील सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करावेअसे निर्देश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे यांनी दिले आहेत. तर महापालिका निवडणूक प्रक्रिया ही केवळ प्रशासनाची नव्हे तर नागरिकांचा विश्वास जपण्याची जबाबदारी आहे. त्यामुळे महापालिका निवडणुकीचे कामकाज करणाऱ्या अधिकाऱ्यांनी पोलिस प्रशासनासोबत समन्वय ठेवत निवडणूक व्यवस्थापनसुविधा आणि कायदेशीर बाबींची अंमलबजावणी काटेकोरपणे करावीअसे निर्देश आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले.

पिंपरी चिंचवड महापालिका सार्वत्रिक निवडणुकीसाठी १५ जानेवारी २०२६ रोजी मतदान होणार असून मतमोजणी १६ जानेवारी २०२६ रोजी होणार आहे. या अनुषंगाने पोलिस प्रशासन व महापालिका प्रशासन यांची संयुक्त बैठक पोलिस आयुक्त कार्यालयात पार पडली.

बैठकीला निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांच्यासह पोलीस सह आयुक्त डॉ. शशिकांत महावरकरअपर पोलीस आयुक्त बसवराज तेलीसारंग आवाडमहापालिकेचे अतिरिक्त आयुक्त विजयकुमार खोराटे,उत्पादन शुल्क अधिक्षक अतुल कानडेउपजिल्हाधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी सुप्रिया डांगेहनुमंत पाटीलडॉ. दिप्ती सूर्यवंशीअर्चना पठारेहिम्मत खराडे,अनिल पवार,नितीन गवळीपल्लवी घाडगेआचारसंहिता कक्ष प्रमुख सुरेखा मानेप्रादेशिक परिवहन अधिकारी संदेश चव्हाण ,पोलीस उपायुक्त श्वेता खेडकरडॉ. शिवाजी पवार,विशाल गायकवाड,संदीप अटोळे   यांच्यासह महापालिकेचे मुख्य अभियंता संजय कुलकर्णीनिवडणूक विभागाचे उपायुक्त सचिन पवार,उपायुक्त अण्णा बोदडेव्यंकटेश दुर्वासकार्यकारी अभियंता हरविंदसिंग बन्सलजनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक यांच्यासह पोलिस व महापालिकेतील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

उपायुक्त सचिन पवार यांनी बैठकीच्या सुरुवातीला पिंपरी चिंचवड महापालिकेने निवडणूकविषयक केलेल्या तयारीची माहिती दिली. तर पोलिस प्रशासनाच्या वतीने निवडणूकविषयक कायदा व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने करण्यात आलेल्या तयारीची माहिती देण्यात आली.

यावेळी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी सांगितले कीमहापालिका निवडणूक ही प्रशासनाच्या कार्यक्षमतेची कसोटी असते. निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक टप्पा वेळेतनियमबद्ध आणि पारदर्शकपणे पूर्ण करण्यासाठी विभागनिहाय सूक्ष्म नियोजन करण्यात येत असून मतदान केंद्रांवरील सुविधामनुष्यबळ व्यवस्थापन आणि तांत्रिक बाबींवर विशेष भर दिला जात आहे. पोलिस प्रशासनाच्या सहकार्याने निवडणूक काळात नागरिकांना सुरक्षित आणि विश्वासार्ह वातावरण उपलब्ध करून देण्याचा प्रशासनाचा ठाम निर्धार आहे.

पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे म्हणाले कीनिवडणूक शांततेत व सुरळित पार पाडणे ही मोठी जबाबदारी आपल्या सर्वांची आहे. यासाठी महापालिका प्रशासनासोबत पोलिस प्रशासनाने समन्वयाने काम करावे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्थेला सर्वोच्च प्राधान्य द्या. शांततापूर्ण मतदानासाठी आवश्यक तेवढा बंदोबस्तगस्त आणि तांत्रिक निगराणी ठेवण्यात आली आहेअसेही ते म्हणाले.

या बैठकीमध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने लागणाऱ्या पोलिस बंदोबस्तावर देखील सविस्तर चर्चा करण्यात आली.

सर्व पथकांनी दक्ष राहावे

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या अनुषंगाने एसएसटीएफएस आणि व्हीएसटी पथके नेमण्यात आली आहेत. आता निवडणुकीतील उमेदवारांचे चित्र स्पष्ट झाले असून सर्व पथकांनी निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी दक्ष राहावे,पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाच्या कर्मचा-यांनी देखील निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याशी समन्वय साधून कामकाज करावे असे निर्देश पोलिस आयुक्त विनयकुमार चौबे व महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी दिले आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!