पिंपरी-चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २४ मध्ये राजकीय वातावरण चांगलेच तापले असून या प्रभागात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे भाजप पुरस्कृत उमेदवार सौ. करिश्मा सनी बारणे. प्रभाग क्रमांक २४ मध्ये करिश्मा बारणे यांना नव्या ओळखीची अजिबात गरज नाही. अनेक वर्षांपासून त्या सामाजिक कार्यात अग्रेसर राहिल्या असून जनतेशी त्यांचा थेट आणि घट्ट संपर्क आहे.
सामाजिक, शैक्षणिक, महिला सक्षमीकरण तसेच नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांसाठी सातत्याने झटणाऱ्या करिष्मा बारणे यांनी भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून प्रभागाच्या विकासासाठी कायम पुढाकार घेतला आहे. रस्ते, पाणी, आरोग्य, स्वच्छता, महिला व युवक प्रश्न अशा विविध विषयांवर त्यांनी ठोस काम केले असून त्यामुळेच प्रभागातील प्रत्येक घराघरात त्यांचे नाव पोहोचले आहे.
या निवडणुकीत एबी फॉर्म वेळेत न मिळाल्यामुळे त्यांना अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक रिंगणात उतरावे लागले असले, तरी भारतीय जनता पक्षाचा अधिकृत पाठिंबा आणि पुरस्करण त्यांना मिळाले आहे. अपक्ष उमेदवारी असली तरी भाजपची संपूर्ण ताकद, संघटन आणि यंत्रणा करिश्मा बारणे यांच्या पाठीशी उभी आहे, हे विशेष उल्लेखनीय आहे.
अपक्ष उमेदवार म्हणून त्यांना “एअर कंडिशनर” हे निवडणूक चिन्ह मिळाले असून या चिन्हासह त्या जोरदार प्रचार करत आहेत. मात्र प्रभागातील मतदारांमध्ये चिन्हापेक्षा नावालाच अधिक महत्त्व असल्याचे चित्र दिसून येत आहे. “चिन्ह कोणतेही असो, मतदान करिश्मा बारणे यांनाच” अशी स्पष्ट भावना मतदारांमध्ये व्यक्त होत आहे.
करिश्मा सनी बारणे यांनी गेल्या अनेक वर्षांत केलेल्या सामाजिक कार्यामुळे त्यांच्यावर नागरिकांचा प्रचंड विश्वास आहे. विशेषतः महिलांच्या सक्षमीकरणासाठी त्यांनी सातत्याने केलेले कार्य, गरजू महिलांना दिलेले पाठबळ, युवकांना संधी देण्याचे प्रयत्न आणि सर्वसामान्यांच्या अडचणींसाठी तत्काळ धावून जाण्याची त्यांची भूमिका यामुळे त्या प्रभागातील लोकप्रिय चेहरा ठरल्या आहेत.
कार्यकर्त्यांमध्येही प्रचंड उत्साह पाहायला मिळत असून, “करिश्मा सनी बारणे – सिर्फ नाम ही काफी है” अशीच एकंदरीत परिस्थिती प्रभाग क्रमांक २४ मध्ये निर्माण झाली आहे. भारतीय जनता पक्षाची मोठी संघटनात्मक ताकद, कार्यकर्त्यांची फळी आणि मतदारांचा विश्वास यामुळे ही निवडणूक करिष्मा बारणे यांच्यासाठी अवघड नाही तर तुलनेने सोपी ठरत असल्याचे राजकीय निरीक्षकांचे मत आहे.
येणाऱ्या १५ तारखेला होणाऱ्या मतदानात प्रभाग क्रमांक २४ मधील मतदार करिश्मा सनी बारणे यांच्या नावालाच पसंती देतील, असा ठाम विश्वास त्यांच्या कार्यकर्त्यांकडून व्यक्त केला जात आहे. विकासाभिमुख नेतृत्व, जनतेशी असलेली नाळ आणि सातत्यपूर्ण सामाजिक कामाची शिदोरी यांच्या जोरावर करिश्मा सनी बारणे या प्रभागात विजयाच्या दिशेने भक्कम पावले टाकत असल्याचे चित्र स्पष्टपणे दिसत आहे.


