spot_img
spot_img
spot_img

प्रभाग ७ मध्ये राष्ट्रवादीचे पदयात्रेतून शक्तिप्रदर्शन

विराज लांडे यांच्‍यासह तीनही उमदेवारांचे नागरिकांकडून उत्स्फूर्त स्वागत

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रभाग क्रमांक सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उमेदवार विराज लांडे यांच्‍यासह इतर उमेदवारांच्या प्रचाराचा शुभारंभ रविवारी (दि. ४) मोठ्या उत्साहात आणि जल्लोषात पार पडला. सँडविक कॉलनी, खंडोबामाळ आणि लांडेवाडी परिसरात नारळ फोडून प्रचाराचा प्रारंभ करत पक्षाने शक्तिप्रदर्शन केले. या निमित्ताने भोसरीतील लांडेवाडी येथील तुळजाभवानी मंदिरातून पदयात्रेला सुरुवात करण्यात आली. धार्मिक आणि सांस्कृतिक वातावरणात सुरू झालेली ही पदयात्रा संपूर्ण प्रभागातून काढण्यात आली.

प्रचार शुभारंभप्रसंगी भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, माजी स्थायी समिती अध्यक्ष अजित गव्हाणे, माजी महापौर मोहिनी लांडे, माजी नगरसेवक विश्‍वनाथ लांडे, सखाराम डोळस, बाळासाहेब गव्हाणे, निवृत्ती फुगे, नंदू शिंदे, निवृत्ती शिंदे, अभिमन्यू लांडगे, भानुदास फुगे, विशाल फुगे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी, कार्यकर्ते, ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

भोसरीतील लांडेवाडी येथील तुळजाभवानी मंदिरातून निघालेली पदयात्रा खंडोबा मंदिर, गव्हाणे वस्ती, आदिनाथनगरसह विविध भागांतून मार्गक्रमण करत पुढे गेली. रस्त्याच्या दुतर्फा उभे असलेले नागरिक, महिला, युवकांनी पदयात्रेचे उत्स्फूर्त स्वागत केले. ठिकठिकाणी घोषणाबाजी, फटाक्यांची आतषबाजी आणि नागरिकांचा उत्साह पाहता संपूर्ण प्रभागात राष्ट्रवादीमय वातावरण निर्माण झाल्‍याचे चित्र होते.

या प्रभागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाकडून अ प्रवर्गातून विराज लांडे, ब प्रवर्गातून अनुराधा लांडगे, क प्रवर्गातून अश्विनी फुगे तर ड प्रवर्गातून अमोल डोळस हे उमेदवार निवडणूक रिंगणात उतरले आहेत. चारही गटांतील उमेदवारांनी एकत्रितपणे पदयात्रेत सहभाग घेत मतदारांशी थेट संवाद साधला. स्थानिक विकास, मूलभूत सुविधा, पाणी, रस्ते, स्वच्छता आणि नागरिकांच्या दैनंदिन प्रश्नांवर भर देत प्रचार करण्यात आला.

ज्येष्ठ नेत्यांच्या उपस्थितीमुळे कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला असून प्रभाग सातमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विजयासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन उपस्‍थित मान्‍यवरांनी प्रचार शुभारंभाच्‍या माध्यमातून केले.

भोसरी विधानसभेचे प्रथम आमदार विलास लांडे, अजित गव्‍हाणे यांच्‍या मार्गदर्शनाखाली प्रभागात नागरिकांच्‍या भेटीगाठी, होम टू होम प्रचार सुरू केलाच होता. रविवारी (दि. ४) प्रभाग क्रमांक ७ मधील मान्‍यवर ग्रामस्‍थ, पक्षाचे प्रमूख पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्‍या उपस्‍थितीत प्रचाराचा शुभारंभ केला. माझ्यासह इतर तीनही उमेदवारांच्‍या प्रचाराचा शुभारंभ असून नागरिकांकडून उत्‍स्‍फुर्तपणे प्रेम, आशिर्वाद मिळत आहेत.

– विराज विश्‍वनाथ लांडे, उमेदवार, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, प्रभाग क्रमांक ७

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!