शबनम न्यूज | प्रतिनिधी
प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली,प्रचार फे-यांची लगभ आणि पदयात्रेतील नागरीकांचा सहभाग बरेच काही सांगून जातो.प्रभागातील नागरीक उस्फुर्तपणे प्रचार रँलीमध्ये सहभागी तर होत आहेतच परंतू आपल्या सहभागाबरोबर नागरीकांच्या प्रतिक्रियाही खुप काही बोलक्या असल्याचे दिसत आहे.
या प्रतिक्रियेवरून प्रभाग २६ मधील या पँनेलच्या विजयाची नांदी घुमत असल्याचे पहायला मिळत आहे.
प्रभाग क्र.२६ मधील विशालनगर परिसरात ओवळ स्प्रिंग,अक्षय नगर फेज–१,एपिक सोसायटी,फ्रीडम पार्क,निकोस्काय सोसायटी,अशोक हेरिटेज,ओंकार रेसिडेन्सी तसेच श्वेतागण श्री मंगलमूर्ती सोसायटी या सर्व सोसायट्यांना भेट देत सोसायटीमधील मतदार बंधू-भगिनींशी आपुलकीने संवाद साधला.
यावेळी ‘अ’ गटातील अँड विनायक गायकवाड,’ब’ गटातील आरती सुरेश चौंधे,’क’ गटातील स्नेहा रणजित कलाटे,व’ड’ गटातील संदीप अरूण कस्पटे सर्व उमेदवार उपस्थित होते.
या भेटीदरम्यान नागरिकांनी मांडलेल्या समस्या,सूचना व अपेक्षा काळजीपूर्वक जाणून घेतल्या असून,त्यावर सकारात्मक आणि ठोस तोडगा काढण्याचा विश्वास दिला.
भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वाखाली केंद्रात आणि राज्यात राज्यातील लाडक्या बहीणींचे लाडके भाऊ देवाभाऊ अर्थात मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांच्या नेतृत्वात विकासकामांना भरीव गती मिळाली आहे.पायाभूत सुविधा,नागरिकांच्या मूलभूत गरजा आणि सर्वसमावेशक विकास यावर ठोस भर देत “सबका साथ,सबका विकास” या जयघोषाने प्रत्येक समाजघटकाला विकासाच्या मुख्य प्रवाहात सामावून घेण्याचा भाजपचा सातत्याने ठोस प्रयत्न आहे.
नागरिकांचा विश्वास आणि सहकार्य यांच्या बळावर प्रभागाच्या सर्वांगीण विकासाची ही विकासयात्रा अधिक वेगाने पुढे नेण्यासाठी कटीबध्द होणे गरजेचे आहे.
प्रभागातील नागरीकांच्या प्रतिसादाने तथा सहकार्याने भाजप कमळ ताकदीने फुलवणार हे मात्र नक्की.




