spot_img
spot_img
spot_img

डॅमेज कंट्रोलिंगसाठी आलेल्या अजित पवारांना निवडणूक प्रमुख शंकर जगताप यांच्याकडून धक्का!

अजित पवारांच्या आरोपानंतर दुसऱ्याच दिवशी राष्ट्रवादीतील दिग्गज भाजपामध्ये!

भाजपाचे “विकासाचे व्हिजन” सर्वमान्य; संघटनेचे बळ वाढतेय: शंकर जगताप

शबनम न्यूज:प्रतिनिधी

पिंपरी  3 जानेवारी : डॅमेज कंट्रोलिंगसाठी आलेल्या राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांना निवडणूक प्रमुख आमदार शंकर जगताप यांनी धक्का दिला आहे. आदल्या दिवशी अजित पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन तथ्यहीन आरोप केले. उमेदवारांना दबावाखाली माघार घ्यायला लावत असल्याचे आरोप केले.आणि दुसऱ्याच दिवशी अजित पवारांनी केलेले आरोप खोटे ठरवत भर सभेत राष्ट्रवादीच्या माजी नगरसेवकांनी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. या प्रवेशामुळे भाजपची पिंपळे गुरव, सांगवी, नवी सांगवी या भागात ताकद वाढली आहे.

 

शनिवारी प्रचाराचा नारळ फोडताना मा.नगरसेविका सुषमा तनपुरे,  मा.श्रीधरभाऊ वाल्हेकर – माजी सभापती शिक्षण मंडळ, मा. राजेंद्र साळुंके – माजी नगरसेवक, मा. संदीप चिंचवडे – मा. नगरसेवक, मा. विनोद कांबळे – सामाजिक न्याय विभाग शहराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस, मा. सुरेंद्र भोईर – सामाजिक कार्यकर्ते, मा. सौ. रुपाली सचिन वाल्हेकर, मा. रत्नाताई भापकर, मा. सौ. मिराताई वाल्हेकर, मा. श्री. सचिन श्रीधर वाल्हेकर – उपाध्यक्ष पिंपरी विधान, मा.सुर्यकांत पात्रे – उपाध्यक्ष सामाजिक न्याय, मा. सुभाष वाल्हेकर यांचा प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत भक्ती शक्ती समूह शिल्पा जवळ प्रचाराचा शुभारंभ करताना प्रवेश करण्यात आला. आणि या प्रवेशामुळे चिंचवड विधानसभेसह नवी सांगवी, सांगवी, पिंपळे गुरव भागातील भाजपची ताकद वाढणार आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी शुक्रवारी (दि 2)
पत्रकार परिषद घेऊन तथ्यहीन आरोप केले. ज्यामध्ये आमच्या उमेदवारांना दबावाखाली ठेवले जात आहे. माघार घेण्यासाठी साम-दाम दंड भेदाचा अवलंब केला जात आहे असे तथ्यहीन आरोप केले. अजित पवार यांचे हे स्क्रिप्टेड भाषण आणि स्क्रिप्टेड आरोप आजच्या प्रवेशाने अक्षरशः खोडून काढले.

निगडी येथील भक्ती शक्ती समूहाच्या प्रांगणामध्ये आणि प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत या पक्षप्रवेशाने विजयाचा पुन्हा एकदा एल्गार  करण्यात आला.  

भाजप निष्ठावंत कार्यकर्त्यांवर केव्हाही, कधीही अन्याय करत नाही. विरोधक तथ्यहीन आरोप करतील मात्र आम्ही  विकासाच्या गोष्टीतून त्यांना पिंपरी चिंचवडचे नवे पर्व दाखवून देणार आहोत.बोलायला जेव्हा मुद्दे कमी पडतात तेव्हा आरोपांच्या फैरी झडतात. आजच्या पक्ष प्रवेशाने हेच दाखवून दिले आहे. टीकेवर टीका करत राहिलो तर विकासाचा मुद्दा मागे पडेल म्हणून आम्ही “विकासाच्या व्हिजन”वर बोलणार आहोत.

शंकर जगताप
आमदार तथा निवडणूक प्रमुख भाजपा 
 पिंपरी चिंचवड शहर.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!