राष्ट्रवादीकडून लढताहेत राजेंद्र जगताप, उमा पाडुळे, दिप्ती कांबळे, अरुण पवार
शबनम न्यूज | प्रतिनिधी
महापालिका निवडणुकीच्या प्रभागात प्रचाराला वेग आला असून, नवी सांगवी प्रभाग क्र. ३१ मधील राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार माजी नगरसेवक राजेंद्र जगताप, उमा पाडुळे, दिप्ती अंबरनाथ कांबळे आणि अरुण पवार यांनी प्रचारात आघाडी घेतली आहे. घरोघर जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत विकासकामांचा आढावा मांडून नवी सांगवी-पिंपळे गुरव समस्यामुक्त करण्याचा ठाम विश्वास मतदारांना दिला.
राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार नवी सांगवी समस्यामुक्त करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. नागरिकांच्या मूलभूत सुविधांपासून ते पायाभूत विकासकामांपर्यंतच्या मुद्द्यांवर उमेदवार भर देत आहेत. स्थानिक समस्या सोडवण्यासाठी ठोस आराखडा मांडत आहेत. प्रचारादरम्यान ‘आम्ही आपल्यासोबत आहोत’, हा विश्वास नागरिकांकडून मिळत आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या प्रचारात तरुणाई, महिला आणि ज्येष्ठ नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होत आहेत. विशेषतः प्रभाग क्र. ३१ मधील अंतर्गत रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य सुविधा, स्वच्छता, शिक्षण, रोजगार या मुद्द्यावर उमेदवारांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. कार्यकर्त्यांचा उत्साह आणि संघटित प्रचार यामुळे या चारही उमेदवारांची निवडणूक रिंगणात भक्कम पकड निर्माण झाल्याचे चित्र आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या उमेदवारांनी केलेली विकासकामे :
सुसज्ज नटसम्राट निळू फुले नाट्यगृह,
* राजमाता जिजाऊ उद्यान (डायनासोर गार्डन) नूतनीकरण,
* २० दशलक्ष लिटर पाण्याची टाकी बांधली.
* गल्ली बोळातील सिमेंट रस्ते केले.
* पाण्याच्या जुन्या पाईप लाईन काढून त्या ठिकाणी नवीन पाईप लाईन
* कोरोना काळात २४ तास उपलब्ध राहून लोकांना हॉस्पिटलमध्ये ऑक्सिजन, बेड मिळवून दिले.
* कोरोना काळात नागरिकांना गावाला जाण्यासाठी पासची, अॅम्ब्युलन्सची व प्रवासाची व्यवस्था, अन्नधान्य घरपोच
* हुशार व गोरगरीब होतकरू विद्यार्थ्यांना शाळा व कॉलेजमध्ये प्रवेश, शैक्षणिक मदत
* सांगली, कोल्हापूर आणि कोकण भागातील पूरग्रस्तांना अन्नधान्य, कपडे आणि गरजू वस्तूंचा पुरवठा
* भाजी व फळे विक्रेत्यांना साई चौकात जागा उपलब्ध करुन तिथे भाजी मंडई स्थापन करुन दिली.
* सोसायट्याचा पिण्याच्या पाण्याचा प्रश्न, कचरा समस्या, वीजेची समस्या सोडवली.
* युवक-युवतींना रोजगार मार्गदर्शन आणि महिला बचत गटांना सक्रिय मदत.
* मराठवाडा भवन व वसतिगृहासाठी पिंपळे गुरवमधील कोट्यवधी रुपये किंमतीची १० गुंठे जागा दान केली.


