शबनम न्यूज | प्रतिनिधी
जनतेच्या मनात विश्वास निर्माण करणारे नेतृत्व आणि विकासासाठीची ठाम निष्ठा अशी ओळख प्रियांका ताई प्रवीण बारसे यांची झाली आहे. पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीत प्रभाग क्रमांक ५ गवळीनगर येथून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या अधिकृत उमेदवार म्हणून त्या निवडणूक रिंगणात असून त्यांच्या प्रचाराला मतदारांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत आहे. दिवसेंदिवस प्रचाराला वेग येताना दिसत असून परिसरात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
घरोघरी जाऊन मतदारांशी थेट संवाद साधत प्रियांका ताई बारसे नागरिकांच्या समस्या समजून घेत आहेत. अनेक ठिकाणी महिलांकडून त्यांचे औक्षण करून स्वागत केले जात असून ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद त्यांना लाभत आहे. युवक, महिला, ज्येष्ठ तसेच सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी आणि विश्वासाची भावना दिसून येत आहे.

प्रभागातील पाणीपुरवठा, ड्रेनेज, रस्ते, स्वच्छता, आरोग्य सुविधा, महिला व युवकांसाठी रोजगाराच्या संधी, तसेच मूलभूत नागरी सुविधांचा प्रश्न सोडवण्यावर त्यांचा विशेष भर आहे. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा ध्यास आहे” असे त्या प्रचारादरम्यान सांगत आहेत.
स्थानिक प्रश्नांची सखोल माहिती, प्रशासनाचा अनुभव आणि जनतेशी असलेला थेट संवाद ही त्यांची ताकद मानली जात आहे. विकासकामांमध्ये पारदर्शकता, सर्वसामान्यांना न्याय आणि प्रभागात समतोल विकास घडवून आणण्याचा त्यांचा संकल्प मतदारांपर्यंत पोहोचत आहे.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या धोरणांवर विश्वास ठेवून अनेक कार्यकर्ते, पदाधिकारी आणि नागरिक मोठ्या संख्येने प्रचारात सहभागी होत आहेत. त्यामुळे प्रभाग क्रमांक ५ गवळीनगरमध्ये निवडणुकीची चुरस वाढली असून प्रियांकाताई प्रवीण बारसे यांचे नाव विश्वासाचे व विकासाचे प्रतीक म्हणून पुढे येत आहे.



