spot_img
spot_img
spot_img

महापालिका निवडणूक : आज अखेर ३८ उमेदवारांनी घेतली माघार

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५–२६ च्या पार्श्वभूमीवर उमेदवारी माघारी घेण्याच्या अंतिम दिवशी मोठ्या प्रमाणात हालचाल पाहायला मिळाली. आज अखेर तब्बल ३८ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले असून, आता निवडणूक रिंगणात एकूण ४१ उमेदवार कायम राहिले आहेत.

माघारींच्या प्रक्रियेमुळे अनेक प्रभागांतील लढतींचे चित्र स्पष्ट झाले असून, काही ठिकाणी थेट तर काही ठिकाणी चुरशीच्या लढती होणार असल्याचे संकेत मिळत आहेत.

क्षेत्रीय कार्यालयनिहाय माघार घेतलेल्या उमेदवारांचा तपशील पुढीलप्रमाणे —

अ क्षेत्रीय कार्यालय : ११ उमेदवारांनी माघार

ब क्षेत्रीय कार्यालय : २ उमेदवारांनी माघार

क क्षेत्रीय कार्यालय : १२ उमेदवारांनी माघार

ड क्षेत्रीय कार्यालय : ८ उमेदवारांनी माघार

इ क्षेत्रीय कार्यालय : ५ उमेदवारांनी माघार

फ क्षेत्रीय कार्यालय : एकही माघार नाही (निरंक)

ग क्षेत्रीय कार्यालय : २ उमेदवारांनी माघार

ह क्षेत्रीय कार्यालय : १ उमेदवाराने माघार

माघारीनंतर आता अनेक प्रभागांत थेट लढती स्पष्ट झाल्या असून, काही ठिकाणी बहुकोनी संघर्ष कायम आहे. त्यामुळे प्रचाराला अधिक वेग येण्याची शक्यता आहे. उमेदवारांकडून प्रचार फेऱ्या, बैठका, गाठीभेटी आणि मतदारांशी थेट संवाद यावर भर दिला जात आहे.

आता अंतिम उमेदवार निश्चित झाल्याने प्रचाराचा रंग चढणार असून, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या निवडणुकीत पुढील टप्प्यात राजकीय वातावरण अधिक तापणार हे निश्चित आहे.

नामनिर्देशन मागे घेणाऱ्या उमेदवारांची नावे –
1) अश्विनी निलेश खंडेराव – १० अ
2) रोहिणी प्रसाद रासकर -१० ब
3) भालदार गुलामअली इब्राहिम -१४ अ
4) संगिता खेमराज काळे – १५ ब
5) शुभांगी विलास शिंदे -१५ ब
6) स्मिता जयंत बागल -१५ ब
7) संगिता खेमराज काळे -१५ क
8) स्मिता जयंत बागल -१५ क
9) पूजा राजेंद्र सराफ -१८ ब
10) मनिषा चंद्रहास वाल्हेकर -१७ क
11) जुनेद अहमद चौधरी -२ क
12) खान मोहम्मद अरिफ -२ क
13) लांडगे श्रद्धा रवि – ६ ब
14) ताठे प्रसाद तुकाराम -६ ब
15) पंकज शिवाजी पवार -८ अ
16) वाघमारे राहुल बाबासाहेब -९ अ
17) अँड. दत्ता हरिश्चंद्र झुळूक -९ अ
18) कांबळे उत्तम संभाजी -९ अ
19) शेरखाने अजय देविदास- ९ अ
20) राजेश यशवंतराव नागोसे- ९ ड
21) दिपक राजू म्हेत्रे -९ ड
22) भोसले हनुमंतराव भीमराव -९ ड
23) गायकवाड विनय रमेश -२५ अ
24) मोनिका नितीन दर्शले -२५ ब
25) वाकडकर राम हनुमंत -२५ ड
26) गायकवाड ममता विनय -२६ अ
27) जयनाथ काटे -२८ ड
28) राजू बाबुराव लोखंडे -२९ क
29) रणपिसे मधुकर सोपान – २९ ड
30) जगताप अक्षय किसन -२९ ड
31) भोसले रजनी निखील -३ अ
32) सचिन किसन लांडगे -५ ड
33) शिंदे भरत किसनराव -५ ड
34) लोंढे शुभांगी संतोष -७ अ
35) लोंढे प्रज्वल संतोष -७ अ
36) साठे कल्याणी -२१ क
37) बारणे साक्षी तानाजी -२३ ब
38) आढाव आरती निलेश- ३१ अ

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!