शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पडली. या छाननीदरम्यान प्रभाग क्रमांक १६ मधील ओबीसी महिला प्रवर्गातून उमेदवारी दाखल केलेल्या सौ. जयश्री मोरेश्वर भोंडवे यांचा अर्ज पूर्णतः वैध ठरला असून त्यांची उमेदवारी निश्चित झाली आहे.
मात्र काही प्रसार माध्यमांमध्ये सौ. जयश्री भोंडवे यांचा अर्ज बाद झाल्याची चुकीची व दिशाभूल करणारी बातमी प्रसारित करण्यात आली होती. ही माहिती पूर्णतः अफवा असून त्यास कोणताही अधिकृत आधार नाही, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून झालेल्या छाननीत सौ. जयश्री भोंडवे यांनी सादर केलेले सर्व आवश्यक कागदपत्रे योग्य असल्याचे आढळून आले असून ओबीसी प्रवर्गातील त्यांचा उमेदवारी अर्ज वैध ठरवण्यात आला आहे.
या चुकीच्या बातम्यांमुळे मतदारांमध्ये संभ्रम निर्माण होऊ नये, यासाठी संबंधितांनी अधिकृत माहितीवरच विश्वास ठेवावा, असे आवाहनही करण्यात आले आहे. सौ. जयश्री मोरेश्वर भोंडवे या आता प्रभाग क्रमांक १६ मधून अधिकृतपणे निवडणूक रिंगणात असून पुढील प्रचाराची तयारी सुरू करण्यात आली आहे.


