spot_img
spot_img
spot_img

महानगरपालिका निवडणूक: मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून निरंजन कुमार सुधांशू यांची निवड

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणूक २०२५-२६ साठी राज्य निवडणूक आयोगाकडून मुख्य निवडणूक निरीक्षक म्हणून पुण्यातील यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी (यशदा) चे संचालक निरंजन कुमार सुधांशू यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तर निवडणूक निरीक्षक म्हणून विभागीय आयुक्त, पुणे यांच्याकडून सांगली जिल्ह्याच्या जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या अध्यक्षा सरिता नरके यांची नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती निवडणूक अधिकारी श्रावण हर्डीकर यांनी दिली आहे.

मुख्य निवडणूक निरीक्षक निरंजन कुमार सुधांशू यांच्या संपर्कासाठी त्यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०९६०९०७५८ हा असून निवडणूक निरीक्षक सरिता नरके यांचा भ्रमणध्वनी क्रमांक ९०९६०९०७५७ हा आहे. तसेच मुख्य निवडणूक निरीक्षक यांचा अधिकृत ई-मेल आयडी [email protected] असा आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!