शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) पक्षाकडून घड्याळ या चिन्हावर प्रभाग क्रमांक 5 – गवळीनगर सर्वसाधारण महिला गटातून अधिकृत उमेदवार म्हणून प्रियांका ताई बारसे यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.
अर्ज दाखल करण्यापूर्वी परिसरात उत्साहाचे वातावरण पाहायला मिळाले. “एक बार फिरसे प्रियांका बारसे” अशा जोरदार घोषणांनी परिसर दणाणून गेला. कार्यकर्ते, पदाधिकारी, महिला भगिनी आणि स्थानिक नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावत आपला पाठिंबा जाहीर केला.
प्रियांका ताई बारसे या गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्यात सक्रिय असून महिलांचे प्रश्न, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, आरोग्य सुविधा तसेच मूलभूत नागरी सोयींसाठी त्यांनी सातत्याने पाठपुरावा केला आहे. प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी ठोस नियोजन आणि पारदर्शक प्रशासन हे त्यांचे प्रमुख उद्दिष्ट असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
“प्रभाग क्रमांक पाचचा सर्वांगीण विकास, महिलांचे सक्षमीकरण, युवकांना रोजगाराच्या संधी, तसेच नागरिकांच्या दैनंदिन अडचणी सोडवणे यासाठी मी कटिबद्ध आहे. नागरिकांनी दिलेल्या विश्वासाला न्याय देण्याचा पूर्ण प्रयत्न करेन,” अशी प्रतिक्रिया प्रियांका ताई बारसे यांनी अर्ज दाखल केल्यानंतर व्यक्त केली.
यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) चे स्थानिक पदाधिकारी, माजी नगरसेवक, कार्यकर्ते तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. एकजुटीचे आणि ताकदीचे प्रदर्शन करत प्रभाग क्रमांक पाचमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक प्रचाराची जोरदार सुरुवात केल्याचे चित्र दिसून आले.


