spot_img
spot_img
spot_img

भीमा कोरेगाव विजयस्तंभ वंदनासाठी रहाटणीतून मोफत बस सेवा

भीम गर्जना युवा प्रतिष्ठानचा उपक्रम

शबनम न्यूज | प्रतिनिधी

विजयस्तंभ शौर्यदिनाच्या पार्श्वभूमीवर रहाटणी, तापकीर नगर तसेच श्रीनगर परिसरातील नागरिक व भीम अनुयायांसाठी भीमा कोरेगाव येथे जाण्यासाठी मोफत बस सेवेचे आयोजन करण्यात आले आहे. हा उपक्रम भीम गर्जना युवा प्रतिष्ठान, रहाटणी यांच्या वतीने राबविण्यात येत असून, “चला भीमा कोरेगावला… विजयस्तंभास मानवंदना देण्यासाठी!” या संकल्पनेतून हा उपक्रम साकारण्यात आला आहे.

ही मोफत बस सेवा गुरुवार, दिनांक १ जानेवारी २०२६ रोजी सकाळी ठीक ९.०० वाजता निघणार असून, प्रस्थान स्थळ गोडंबे चौक, रहाटणी असेल. विजयस्तंभ शौर्यदिनानिमित्त मोठ्या संख्येने नागरिकांना, युवकांना व भीम अनुयायांना सहभागी होता यावे, या उद्देशाने हा उपक्रम राबवण्यात येत आहे.

या यात्रेसाठी नावनोंदणी आवश्यक असून, इच्छुक नागरिकांनी ३१ डिसेंबर २०२५ पर्यंत खालील क्रमांकांवर संपर्क साधून आपले नाव नोंदवावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.
संपर्कासाठी —
अमोल उबाळे : ९७६७१०२३७०
अक्षय कांबळे : ९८८१२१३६१२
अमित मांजरे : ९३७००३९९९६

भीमा कोरेगाव विजयस्तंभ शौर्यदिनाच्या निमित्ताने सामाजिक एकोपा, संविधानिक मूल्ये आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना अभिवादन करण्यासाठी हा उपक्रम राबवला जात असल्याचे आयोजकांनी सांगितले. तसेच सर्वांनी वेळेचे बंधन पाळून मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन भीम गर्जना युवा प्रतिष्ठान, र्हाटणी यांच्या वतीने करण्यात आले आहे

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!