spot_img
spot_img
spot_img

पीसीएमसी–आयडीएतर्फे सरस्वती विद्यालयात ‘कम्युनिटी डेंटल हायजिन’ अंतर्गत दंत तपासणी व मुखस्वच्छता शिबिर

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका हद्दीतील इंडियन डेंटल असोसिएशन – पिंपरी चिंचवड शाखा (IDA PCMC) व IDA MSB CDH (Community Dental Hygiene) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘स्वच्छ मुख अभियान’ अंतर्गत विद्यार्थ्यांसाठी मोफत दंत तपासणी व मुखस्वच्छता जनजागृती शिबिराचे आयोजन करण्यात आले. हा उपक्रम सोमवार, दिनांक २४ डिसेंबर २०२५ रोजी सरस्वती माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय, एल.आय.जी. कॉलनी, सिंधूनगर, निगडी–४४ येथे यशस्वीपणे पार पडला.

या शिबिरामध्ये शाळेतील इयत्ता ८ वी व ९ वी मधील सुमारे ४५० विद्यार्थ्यांची सखोल दंत तपासणी करण्यात आली. विद्यार्थ्यांच्या दातांची स्थिती, हिरड्यांचे आरोग्य, दात किडण्याची कारणे तसेच तोंडाच्या स्वच्छतेचे महत्त्व याबाबत तज्ज्ञ दंतवैद्यांनी सविस्तर मार्गदर्शन केले.

या संपूर्ण उपक्रमाचे नियोजन व यशस्वी आयोजन आयडीए पिंपरी-चिंचवडचे मानद अध्यक्ष डॉ. विनय कुमार शेट्टी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेतील अनुभवी दंतवैद्यांनी या शिबिरात सक्रिय सहभाग घेतला.

या शिबिरात सहभागी झालेले डॉक्टर पुढीलप्रमाणे —
डॉ. विनय कुमार शेट्टी, डॉ. दिपाली पाटेकर, डॉ. ऋतुजा विलास जगताप, डॉ. दीपिका जैन मांडोत, डॉ. सौरभ तनपुरे, डॉ. प्रणोती तनपुरे, डॉ. गौरव विस्पुते, डॉ. मंजुषा दलवी, डॉ. सचिन फुंडे, डॉ. मधुसूदन टिडके, डॉ. हृषीकेश जोशी तसेच इंटर्न सुमती बिर्ला यांनीही या उपक्रमात सहभाग नोंदवला.

यावेळी विद्यार्थ्यांना योग्य ब्रशिंग पद्धत, दंतआरोग्याचे महत्त्व, रोजच्या जीवनात तोंडाची स्वच्छता कशी राखावी याबाबत प्रत्यक्ष प्रात्यक्षिकांसह माहिती देण्यात आली. तसेच विद्यार्थ्यांना टूथब्रश, टूथपेस्ट व आवश्यक दंत-किटचे मोफत वितरण करण्यात आले.

या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये दंतआरोग्याबाबत जागरूकता वाढून लहान वयातच चांगल्या आरोग्यदायी सवयी रुजण्यास मदत होईल, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला. शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षकवर्ग व व्यवस्थापन यांनी या सामाजिक उपक्रमासाठी मोलाचे सहकार्य केले.

विद्यार्थ्यांचे दंतआरोग्य सुदृढ राखणे आणि समाजात मुखस्वच्छतेबाबत जनजागृती निर्माण करणे, हाच या उपक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे आयडीए पिंपरी–चिंचवड शाखेच्या वतीने सांगण्यात आले.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!