spot_img
spot_img
spot_img

राष्ट्रवादीचा प्रभाग ११ मध्ये मास्टरस्ट्रोक; आमदार समर्थक मारुती गणपत जाधव यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जाहीर प्रवेश

पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रभाग क्रमांक ११ मध्ये मोठा राजकीय मास्टरस्ट्रोक खेळत आमदार समर्थक व सामाजिक कार्यकर्ते मारुती गणपत जाधव यांचा जाहीर प्रवेश करून घेतला आहे. त्यांच्या प्रवेशामुळे प्रभागातील राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली असून राष्ट्रवादीच्या पॅनलला मोठी ताकद मिळाल्याचे बोलले जात आहे.

मारुती जाधव हे फुलेनगर, घरकुल व शरदनगर परिसरात अत्यंत परिचित नाव आहे. गेल्या अनेक वर्षांपासून त्यांनी कोणताही राजकीय स्वार्थ न ठेवता सामाजिक कार्य, गरजू नागरिकांना मदत, युवकांना दिशा देणे, नागरिकांच्या दैनंदिन समस्या प्रशासनापर्यंत पोहोचवणे अशी कामे सातत्याने केली आहेत. त्यांच्या या निस्वार्थ सेवेमुळे मोठा मित्रपरिवार आणि जनसमर्थन तयार झाले असून सर्वसामान्य नागरिकांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वासाचे नाते निर्माण झाले आहे.

विशेष म्हणजे मारुती जाधव हे घरकुल परिसरातील स्थानिक उमेदवार असल्याने “आपला माणूस” म्हणून त्यांच्याकडे पाहिले जाते. त्यामुळे प्रभागातील नागरिक त्यांना प्रथम प्राधान्य देतील, असा विश्वास राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे. स्थानिक प्रश्नांची जाण, परिसरातील वास्तव परिस्थितीची ओळख आणि लोकांशी थेट संवाद साधण्याची क्षमता ही त्यांची मोठी ताकद मानली जात आहे.

त्यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक ११ मध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून कार्यकर्त्यांमध्ये नवचैतन्य संचारले आहे. पक्ष संघटना अधिक मजबूत होत असून पॅनलची एकजूट आणि ताकद लक्षणीयरीत्या वाढल्याचे चित्र दिसत आहे. आगामी निवडणुकीच्या दृष्टीने हा प्रवेश अत्यंत महत्त्वाचा मानला जात असून विरोधकांच्या गोटातही हालचालींना वेग आला आहे.

एकंदरीतच प्रभाग क्रमांक ११ मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसने अनुभवी, सामाजिकदृष्ट्या सक्रिय, जनतेशी थेट नाते असलेला आणि विश्वासार्ह चेहरा पॅनलमध्ये सामावून घेतल्याने आगामी महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादीसाठी अनुकूल ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!