शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २७ मधून सागर कोकणे यांच्या समर्थनार्थ एक वेगळेच आणि भावनिक चित्र पाहायला मिळत आहे. प्रभागातील महिला भगिनींनी सागर कोकणे हेच नगरसेवक म्हणून निवडून यावेत, यासाठी थेट तिरुपती बालाजीला साकडे घातले असून, त्यांच्या विजयासाठी प्रार्थना केली आहे.
सागर कोकणे यांच्या कार्यपद्धतीवर, विकासात्मक दृष्टिकोनावर आणि सर्वसामान्यांशी असलेल्या आपुलकीच्या नात्यावर महिलांचा विशेष विश्वास आहे. नागरिकांच्या अडचणी ऐकून घेणे, त्या तातडीने मार्गी लावण्याचा प्रयत्न करणे, तसेच प्रत्येक घटकाला सोबत घेऊन काम करण्याची त्यांची पद्धत यामुळे ते प्रभागात लोकप्रिय उमेदवार ठरत आहेत.

महिलांनी व्यक्त केले की, “सागर कोकणे हे संवेदनशील, लोकाभिमुख आणि काम करणारे नेतृत्व आहे. महिलांचे प्रश्न, सुरक्षितता, आरोग्य, पाणीपुरवठा, स्वच्छता, रस्ते, स्ट्रीटलाइट, अंगणवाडी, बचतगटांना प्रोत्साहन अशा अनेक विषयांवर त्यांनी नेहमी सकारात्मक भूमिका घेतली आहे.” त्यामुळेच त्यांना नगरसेवक म्हणून पाहण्याची इच्छा महिलावर्ग व्यक्त करत आहे.
प्रभागातील विविध भागांतून सागर कोकणे यांच्या प्रचाराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, महिलांचा सक्रिय सहभाग विशेष लक्षवेधी ठरत आहे. काही महिला भगिनींनी तिरुपती बालाजी येथे जाऊन सागर कोकणे यांच्या विजयासाठी साकडे घातले, ही बाब त्यांच्या लोकप्रियतेचे आणि जनविश्वासाचे प्रतीक मानली जात आहे.
“प्रभागाचा सर्वांगीण, समतोल आणि शाश्वत विकास हाच माझा ध्यास आहे. सर्वसामान्य नागरिक, महिला, ज्येष्ठ, युवक यांना सोबत घेऊन पारदर्शक व प्रभावी काम करण्याचा माझा प्रयत्न राहील,” अशी भावना सागर कोकणे यांनी व्यक्त केली आहे.
एकंदरीतच प्रभाग क्रमांक २७ मध्ये सागर कोकणे यांच्या प्रचाराला केवळ राजकीयच नव्हे तर भावनिक आणि सामाजिक पाठबळही मिळत असून, महिलांच्या या श्रद्धा आणि विश्वासातून त्यांच्या विजयाबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले आहे.


