शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २३ मधून मनिषाताई प्रमोद पवार यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिकच गती मिळताना दिसत आहे. विकासाभिमुख, लोकाभिमुख आणि संवेदनशील नेतृत्व म्हणून ओळख निर्माण करत मनिषाताई पवार नागरिकांच्या घरोघरी जाऊन थेट संवाद साधत आहेत.
प्रचारादरम्यान त्या नागरिकांच्या दैनंदिन समस्या, नागरी सुविधा, पाणीपुरवठा, रस्ते, स्वच्छता, आरोग्य, महिला व युवकांशी संबंधित प्रश्न गांभीर्याने ऐकून घेत असून, प्रत्येक प्रश्नावर ठोस व शाश्वत उपाययोजना करण्याचा विश्वास त्या मतदारांना देत आहेत. यावेळी त्यांनी आपले परिचय पत्रक वितरित करून भविष्यातील विकासात्मक आराखड्याची माहिती नागरिकांपर्यंत पोहोचवली.

आज अशोका सोसायटी, संभाजीनगर परिसरात त्यांनी भेट देऊन मतदारांशी सखोल संवाद साधला. या वेळी नागरिकांनी मनिषाताईंचे औक्षण करून प्रेमळ स्वागत केले. त्यांच्या साधेपणा, आपुलकी आणि कामाची तळमळ पाहून मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले होते.
“प्रभागाचा सर्वांगीण विकास, मूलभूत सुविधांचे बळकटीकरण, महिला-सशक्तीकरण, युवकांना संधी आणि पारदर्शक प्रशासन” ही मनिषाताई पवार यांच्या प्रचाराची प्रमुख दिशा असून, विकासाच्या नव्या पर्वासाठी त्या कटिबद्ध असल्याचे त्या यावेळी बोलताना म्हणाल्या.
एकंदरीतच प्रभाग क्रमांक २३ मध्ये मनिषाताई प्रमोद पवार यांच्या प्रचाराला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात सकारात्मक प्रतिसाद मिळत असून, परिवर्तनाच्या अपेक्षेने मतदार त्यांच्याकडे आशेने पाहत आहेत.



