घरोघरी भेटी, औक्षण व नागरिकांशी थेट संवाद
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या निवडणूक पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १८ मधून ज्योतीताई निंबाळकर यांना मतदारांचा मोठ्या प्रमाणावर पाठिंबा मिळताना दिसत आहे. त्या स्वतः घरोघरी जाऊन मतदारांच्या गाठीभेटी घेत असून, नागरिकांच्या समस्या, अपेक्षा आणि सूचना थेट ऐकून घेत आहेत.
आज तलेरा नगर परिसरात त्यांनी घराघरात भेटी देत मतदारांशी संवाद साधला. यावेळी पाणीपुरवठा, रस्त्यांची दुरवस्था, स्वच्छता, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, महिलांसाठी सुरक्षा व सुविधा, तसेच युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधांबाबत अनेक समस्या आणि सूचना नागरिकांनी मांडल्या. या सर्व प्रश्नांवर प्राधान्याने पाठपुरावा करण्याचे आश्वासन ज्योतीताईंनी दिले.

याच दरम्यान त्यांनी आपले परिचयपत्र मतदारांपर्यंत पोहोचवत, आपल्या कार्याची व विकासाची भूमिका स्पष्ट केली. प्रभागातील नागरिकांकडून मिळणारा सकारात्मक प्रतिसाद पाहता, ज्योतीताई निंबाळकर यांना मोठा जनाधार लाभत असल्याचे चित्र दिसून येत आहे.
विशेष बाब म्हणजे अनेक ठिकाणी महिलांनी पारंपरिक पद्धतीने औक्षण करून ज्योतीताईंंचे स्वागत केले. यामुळे प्रचाराला भावनिक आणि आपुलकीचा स्पर्श मिळाला असून, महिला मतदारांमध्ये त्यांच्याबद्दल विश्वास आणि आपुलकी वाढताना दिसत आहे.
स्थानिक नागरिकांच्या मते, सातत्याने संपर्कात राहणारे, समस्या ऐकून घेणारे आणि प्रत्यक्ष काम करणारे नेतृत्व म्हणून ज्योतीताई निंबाळकर यांच्याकडे पाहिले जात आहे. प्रभाग १८ च्या सर्वांगीण विकासासाठी त्या कटिबद्ध असल्याने आगामी निवडणुकीत त्यांना भक्कम पाठिंबा मिळणार असल्याचा विश्वास मतदार व्यक्त करत आहेत.



