शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक २८, रहाटणी परिसरात अनिता ताई संदीप काटे यांनी नागरिकांशी थेट संपर्क साधत गाठीभेटी घेतल्या. या भेटींमधून त्यांनी घराघरांत जाऊन मतदारांशी संवाद साधत त्यांच्या दैनंदिन समस्या, अपेक्षा व भावना जाणून घेतल्या.
या संवादादरम्यान रस्त्यांची दुरवस्था, पाणीपुरवठा, ड्रेनेज व्यवस्था, स्वच्छता, कचरा व्यवस्थापन, आरोग्य सुविधा, महिलांसाठी सुरक्षिततेचे प्रश्न, ज्येष्ठ नागरिकांच्या सुविधा तसेच युवकांसाठी रोजगार व क्रीडा सुविधांबाबत नागरिकांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. नागरिकांनी मांडलेल्या प्रत्येक प्रश्नाची गांभीर्याने नोंद घेत, त्यावर नियोजनबद्ध आणि वेळेत उपाययोजना करण्याचे आश्वासन अनिता काटे यांनी दिले.

लोकहिताला सर्वोच्च प्राधान्य देत विकासकेंद्रित, पारदर्शक आणि सर्वसमावेशक कार्यपद्धतीतून काम करण्याचा ठाम निर्धार त्यांनी यावेळी व्यक्त केला. “प्रभागाचा सर्वांगीण विकास हाच माझा अजेंडा असून सामान्य नागरिक हा केंद्रबिंदू मानून निर्णय घेतले जातील,” असे त्या म्हणाल्या.
या गाठीभेटींना रहाटणी परिसरातील नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभताना दिसून आला. अनेक ठिकाणी स्थानिक महिला, ज्येष्ठ नागरिक व तरुणांनी स्वतःहून पुढाकार घेत आपल्या समस्या मांडल्या आणि सौ. अनिता काटे यांच्या कार्यशैलीबद्दल विश्वास व्यक्त केला.
नागरिकांशी थेट संवाद, विश्वासार्ह नेतृत्व आणि विकासाची स्पष्ट दिशा यामुळे अनिता संदीप काटे यांच्या प्रचाराला दिवसेंदिवस अधिक बळ मिळत असल्याचे चित्र प्रभाग क्रमांक २८ मध्ये पाहायला मिळत आहे.



