राष्ट्रवादीचा शक्तिप्रदर्शनात्मक अर्ज भरणी कार्यक्रम
शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी–चिंचवड महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने प्रचाराचा जोर वाढवला असून “चला अजून भरायला” या प्रभावी घोषणेसह नगरसेवकपदाचे अधिकृत उमेदवार तुषार भिवाजी
सहाणे यांच्या उमेदवारी अर्ज भरण्यासाठी भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आला आहे.
हा कार्यक्रम सोमवार, दिनांक २९ डिसेंबर २०२५ रोजी सकाळी ९.०० वाजता, इंद्रायणी नगर येथील तुषार भिवाजी सहाणे संपर्क कार्यालयात उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. या अर्ज भरणी कार्यक्रमासाठी प्रभागातील विविध सेक्टरमधून मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते, पदाधिकारी व नागरिक सहभागी होणार असून, संपूर्ण प्रभागात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे.
प्रचाराला जनतेचा वाढता प्रतिसाद
तुषार सहाणे यांनी गेल्या अनेक वर्षांपासून प्रभागात सातत्याने सामाजिक, शैक्षणिक व नागरी प्रश्नांवर काम केले आहे. रस्ते, पाणीपुरवठा, ड्रेनेज, आरोग्य सुविधा, युवकांसाठी संधी, महिला सक्षमीकरण तसेच ज्येष्ठ नागरिकांच्या प्रश्नांवर त्यांनी घेतलेली ठाम भूमिका मतदारांच्या विशेष पसंतीस उतरली आहे. त्यामुळेच “विकासाचा विचार आपला, तुषार सहाणे आपला” अशी भावना नागरिकांमध्ये दिसून येत आहे.
प्रभागभरातून नियोजित सहभाग
अर्ज भरणीच्या दिवशी सेक्टर १, २, ३, ४/६, ७, १०, १२, १३, गुढीविहार, बालाजीनगर, मोशी प्राधिकरण परिसर आदी भागांतून कार्यकर्त्यांचे नियोजनबद्ध आगमन होणार आहे. प्रत्येक भागातून पदयात्रा, दुचाकी रॅली व घोषणाबाजीद्वारे उत्साहात उपस्थिती नोंदवली जाणार आहे.
राष्ट्रवादीची ताकद एकवटणार
या वेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते, पदाधिकारी, माजी नगरसेवक, आजी-माजी लोकप्रतिनिधी तसेच विविध सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे हा अर्ज भरणीचा कार्यक्रम केवळ औपचारिक न राहता, शक्तिप्रदर्शन ठरण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
“विकासाच्या या लढाईत साथ द्या” – तुषार सहाणे
“प्रभागाच्या सर्वांगीण विकासासाठी, पारदर्शक व लोकाभिमुख कारभारासाठी आपण ही निवडणूक लढवत आहोत. जनतेचा विश्वास आणि आशीर्वाद हाच माझा खरा आधार आहे. त्यामुळे सर्व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून मला आशीर्वाद द्यावेत,” असे आवाहन उमेदवार तुषार सहाणे यांनी केले आहे.
नागरिकांना उपस्थित राहण्याचे आवाहन
प्रभागातील जनतेचा पाठिंबा हीच आमची ताकद असून विकासाच्या या लढाईत सर्वांनी एकत्र येत अर्ज भरणी कार्यक्रमाला उपस्थित राहावे, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.


