spot_img
spot_img
spot_img

प्रभाग १४ मध्ये भाजपाला मोठे बळ; दिग्गज माजी नगरसेवकांसह प्रमुख कार्यकर्त्यांचा जाहीर प्रवेश

शबनम न्यूज | प्रतिनिधी

पिंपरी चिंचवड महानगरपालिका सार्वत्रिक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक १४ मध्ये बुधवारी (दि. २३ डिसेंबर) राजकीय क्षेत्रात मोठ्या आणि धक्कादायक घडामोडी घडल्या. या घडामोडींमुळे प्रभागातील निवडणूक वातावरण अधिकच तापले असून राजकीय समीकरणांना नवे वळण मिळाले आहे.

माजी नगरसेवक प्रसाद शेट्टी, माजी नगरसेवक उल्हास शेट्टी, सामाजिक कार्यकर्ते अजय लढा, आकुर्डी परिसरातील तरुणांमध्ये लोकप्रिय असलेले महेश काटे तसेच मोहननगर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय जगताप यांनी आमदार महेशदादा लांडगे व आमदार अमित गोरखे यांच्या उपस्थितीत भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला.

यासोबतच माजी नगरसेवक प्रकाश बाबर यांनी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह भाजपमध्ये प्रवेश करत ‘कमळ’ हाती घेत निवडणुकीचे रणशिंग फुंकले आहे. या सामूहिक प्रवेशामुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपाची संघटनात्मक ताकद मोठ्या प्रमाणात वाढल्याचे चित्र स्पष्ट होत आहे.

या सर्व नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा प्रदीर्घ सामाजिक व राजकीय अनुभव भाजपासाठी महत्त्वाचा ठरणार असून, आगामी निवडणुकीत याचा थेट परिणाम दिसून येईल, अशी चर्चा नागरिकांमध्ये सुरू आहे. सध्याच्या राजकीय घडामोडींमुळे प्रभाग क्रमांक १४ मध्ये भाजपाचे पारडे जड होत असल्याचे संकेत मिळत असून, निवडणूक लढत अधिक रंगतदार होण्याची चिन्हे आहेत.

You Tube

Related Articles

ताज्या बातम्या

error: Content is protected !!