शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रभाग क्रमांक ८ मधून तुषार सहाणे यांनी आपली विकासनिष्ठ भूमिका ठामपणे मांडत प्रचाराला वेग दिला आहे. इंद्रायणीनगर परिसरातील माय-बाप जनतेचा विश्वास, प्रेम आणि आशीर्वाद हाच आपल्या सामाजिक व सार्वजनिक कार्याचा खरा पाया असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
जनतेच्या सहकार्याने पारदर्शक, भ्रष्टाचारमुक्त आणि दर्जेदार विकासकामे राबविणे हेच आपले मुख्य उद्दिष्ट असून प्रभागातील अंतर्गत रस्ते, सांडपाणी व्यवस्था, पाणीपुरवठा, स्टॉर्म वॉटर ड्रेनेज, वीज व स्ट्रीट लाईट्स, कचरा व्यवस्थापन आणि स्वच्छता अभियान अधिक सक्षम केले जाणार असल्याचे तुषार सहाणे यांनी सांगितले. विशेषतः पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पाणी साचण्याच्या समस्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यावर भर दिला जाणार आहे.

महिला सशक्तीकरण, युवकांना कौशल्य प्रशिक्षण व रोजगाराच्या संधी, ज्येष्ठ नागरिकांसाठी आरोग्य व विरंगुळ्याच्या सुविधा, लहान मुलांसाठी सुरक्षित खेळाची मैदाने व उद्याने विकसित करण्याचा संकल्पही त्यांनी व्यक्त केला. प्रभागातील शाळा, अंगणवाडी, आरोग्य केंद्रे आणि सार्वजनिक शौचालये अद्ययावत करून नागरी जीवनमान उंचावण्याचे नियोजन करण्यात येणार आहे.
वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी नियोजनबद्ध उपाय, फूटपाथ व सायकल ट्रॅकची उभारणी, सीसीटीव्हीच्या माध्यमातून परिसराची सुरक्षा वाढविणे तसेच डिजिटल सेवा, ऑनलाइन तक्रार निवारण आणि नियमित जनसंपर्क कार्यालयाच्या माध्यमातून नागरिकांच्या समस्या तात्काळ सोडविण्याचा निर्धार तुषार सहाणे यांनी व्यक्त केला.
“विकास हा घोषणांपुरता मर्यादित न ठेवता तो प्रत्येक घरापर्यंत पोहोचवायचा आहे,” असे सांगत, सर्व समाजघटकांना सोबत घेऊन समतोल व शाश्वत विकास साधण्याची भूमिका त्यांनी मांडली. त्यांच्या या स्पष्ट दृष्टीकोनामुळे प्रभागातील नागरिकांमध्ये सकारात्मक वातावरण निर्माण झाले असून, ‘काम करणारा, सर्वांना समजून घेणारा आणि जबाबदार प्रतिनिधी’ म्हणून तुषार सहाणे यांच्याबद्दल मतदारांमध्ये विश्वास अधिक दृढ होत असल्याचे चित्र दिसून येत आहे.



