शबनम न्यूज | प्रतिनिधी
पिंपरी-चिंचवड शहरातील प्रभाग क्रमांक 23 मध्ये माजी नगरसेविका मनिषाताई प्रमोद पवार यांच्या प्रचाराला मोठ्या प्रमाणावर गती मिळाली असून, मतदारांकडून त्यांना उत्स्फूर्त आणि विश्वासपूर्ण पाठिंबा मिळताना दिसत आहे. सध्या त्यांनी थेट नागरिकांशी संवाद साधत गाठी-भेटींवर विशेष भर दिला असून, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रयत्न मतदारांना भावताना दिसत आहे.
आज मनिषाताई पवार यांनी शिवशंभो कॉलनी, सद्गुरु कॉलनी, गजराज कॉलनी, बालाजी कॉलनी, जय मल्हार कॉलनी लेन नंबर 3 या भागांमध्ये प्रचार दौरा केला. या दौऱ्यादरम्यान नागरिकांनी त्यांचे मनापासून स्वागत करत, विकासकामांचा अनुभव, विश्वासार्ह नेतृत्व आणि सातत्यपूर्ण जनसंपर्क यामुळे मनिषाताई पवार यांनाच पुन्हा संधी द्यावी, अशी भावना व्यक्त केली. विशेषतः ज्येष्ठ महिला व ज्येष्ठ नागरिकांचा आशीर्वाद मनिषाताई पवार यांच्यासोबत असल्याचे चित्र यावेळी दिसून आले. या महापालिका निवडणुकीत मतदार पुन्हा मनिषाताई पवार यांना संधी देतील यात शंका नाही.

या प्रचार दौऱ्यात मनिषाताई पवार यांच्यासोबत सुजाताताई पवार, कांताताई यादव, मंजूताताई गुप्ता, राधाताई देवी, बेबीजलोताई, भारतीताई हुलगे, सुरेखाताई कुचेकर, स्वाती खुसपे, सुमन प्रजापती यांच्यासह अनेक महिला कार्यकर्त्यांचा सक्रिय सहभाग होता. तसेच सामाजिक कार्यकर्ते प्रमोद भाऊ पवार, विनोद भाऊ पवार, दिगंबर भाऊ पवार यांच्यासह आकाश शेलार, सुजित कांबळे, सुजित शिंदे, सनी पारखे, प्रेम पवार, रवी आरेकर, अनिल सूर्यवंशी, नितीन देवकाते, रोहित शिवशरण, आकाश गायकवाड, संभाजी अडसूळ, आदित्य देवराम, कुणाल सोनवणे, प्रज्वल साबळे, शाम केदारी, मलंग शेख, चैतन सूर्यवंशी, विजयराव गाडे, शिर्शेल कांबळे, विनय कांबळे, मंजुनाथ कांबळे, जावेद शेख, लक्ष्मण रॉय, योगेश खताळ, रवी लोंढे आदी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
एकूणच प्रभाग क्रमांक 23 मध्ये मनिषाताई प्रमोद पवार यांच्या नेतृत्वावर जनतेचा ठाम विश्वास असून, त्यांचा प्रचार दिवसेंदिवस अधिक प्रभावी आणि व्यापक होत असल्याचे स्पष्टपणे जाणवत आहे.



